आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस थकबाकीसाठी केंद्राच्या लवकरच उपाययाेजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कृषी क्षेत्रातील पेचप्रसंगामुळे िचंताग्रस्त झालेल्या केंद्र सरकारने अाता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार काेटी रुपयांची थकबाकी रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पावले उचलणार अाहे. त्याचप्रमाणे अलीकडे झालेल्या अवकाळी पावसानंतर गव्हाच्या खरेदीतील धान्याच्या दर्जाचा प्रश्नही साेडवण्याचा प्रयत्न करणार अाहे.

अवकाळी पाऊस अाणि वादळामुळे झालेले िपकांचे नुकसान अाणि ऊस थकबाकी यांसदर्भात िचंतेचे वातावरण िनर्माण झाले असून माेदी सरकार शेतकऱ्यांच्याबाबत असंवेदनशील असल्याची टीका विराेधी पक्षांनी केलेली हाेती. त्या पार्श्वभूमीवर ऊस तसेच गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी उशिरा उच्चस्तरीय बैठक घेण्यात अाली. पंतप्रधान माेदींनी शेतीच्या समस्यांवर तपशीलवार चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्या साेडवण्यासाठी काही सकारात्मक पावले उचलण्यात येणार असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांिगतले.
या बैठकीला वित्तमंत्री अरुण जेटली. गृहमंत्री राजनाथ िसंग, खाद्य मंत्री रामविलास पासवान, कृषी मंत्री राधा माेहन िसंग, वाहतूक मंत्री िनतीन गडकरी, वाणिज्यमंत्री िनर्मला सीतारामन अादी उपस्थित हाेते.

साखर आयात शुल्क वाढीबाबत चर्चा
या बैठकीत साखरेवरील अायात शुल्कात वाढ करून ते सध्याच्या २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणे, धान्य साठवणूक, कर्ज पुनर्रचना, इथेनाॅल उत्पादनाला चालना, पांढऱ्या साखरेसाठी िनर्यात अनुदान अादी विविध विषयांवर सखाेल चर्चा झाली. दर्जेमुळे गहू खरेदीमध्ये येत असलेल्या अडचणींवरदेखील या वेळी ऊहापाेह करण्यात अाला.
साखर उत्पादनात वाढीचा अंदाज
यंदाच्या साखर हंगामात साखर उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होईल असा अंदाज इस्माने व्यक्त केला आहे. जगात ब्राझीलनंतर साखर उत्पादनात बारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ऊस उत्पादकांची थकबाकी, सहकारी साखर कारखान्यांची दुरवस्था यामुळे अनेक कारखाने आजारी आहेत.
बातम्या आणखी आहेत...