आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड्या गरिबी हटवतील, अाफ्रिकेत वाटणार एक लाख कोंबड्या - गेट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन - गरिबी हटवण्यासाठी जगभरात तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असली तरी तंत्रज्ञानाचे बादशहा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना हे मान्य नाही. तंत्रज्ञान किंवा कॉम्प्युटरनेे नाही तर कोंबडीच्या माध्यमातून जगातील गरिबी हटवली जाऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

बिल गेट्स जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. जे लोक गरिबीत आयुष्य घालवत आहेत, ते कोंबड्या पाळून आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतात. इंटरनेट किंवा कॉम्प्युटरमुळे लोकांचे जीवनमान सुधारणार नसल्याचे मत बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे. गेट्स ७५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे पाच लाख कोटी रुपयांच्या खासगी मालमत्तेचे मालक आहेत. एकेकाळी ते प्रत्येक घरात मायक्रोसाॅफ्टचे कॉम्प्युटर असावे असे सांगत होते. मात्र, त्यांची संस्था बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने नुकताच ग्लोबल डेव्हलपमेंट समूह हेफर इंटरनॅशनलसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती त्यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दिली. या माध्यमातून त्यांनी संस्था अाफ्रिकी देशांमधील लोकांना एक लाख कोंबड्या वाटणार आहेत. या देशांमध्ये अनेक लोक असे अाहेत, जे दररोज दाेन डॉलर (१३४ रुपये) पेक्षा कमी कमवत असल्याचे गेट्स यांनी सांगितले. त्यामुळे या भागातील ३० टक्के ग्रामीण कुटुंबीयांना कोंबडीची पिल्ले वाटणार आहेत, या माध्यमातून ते हा व्यवसाय वाढवू शकतील. सध्या येथील फक्त पाच टक्के कुटुंब हा व्यवसाय करतात.

कोंबड्यांवर खर्च कमी, उत्पन्न जास्त
इतर कामांच्या तुलनेत या कामात जास्त उत्पन्न असल्याचे मत गेट्स यांनी व्यक्त केले आहे. कोंबड्यांना पाळण्यासाठी कमी खर्च लागतो. तसेच त्यांची संख्यादेखील लवकर वाढते. इतकेच नाही, तर अंडे आणि चिकनच्या माध्यमातून पोषक अन्नदेखील मिळते. कोंबड्या पाळल्यामुळे महिलांची स्थितीदेखील चांगली होते. गाय किंवा बकरीसारख्या मोठ्या प्राण्यांपेक्षा कोंबड्या घराच्या जवळ राहू शकतात. त्यामुळे अनेक देशांमध्ये कोंबड्यांना "महिलांचा पाळीव प्राणी' असे संबोधले जाते. कोंबड्या सांभाळणाऱ्या महिला आपले उत्पन्न कुटंुबीयांवरच खर्च करतात.
बातम्या आणखी आहेत...