आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी फटाकाबाजार: ‘चायना’ मार्क काढून व्हीलचेअरच्या कंटेनरमधून फटाक्यांची आयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात चिनी फटाके विक्रीवर बंद आहे. तरीदेखील तस्करीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चिनी फटाके भारतात येत आहेत. यासाठी तस्करांनी नव-नवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. व्हीलचेअर, मेडिकल उपकरणे, खेळण्याच्या कंटेनरमध्ये ठेवून मोठ्या प्रमाणात असे फटाके भारतात येत आहेत.
ग्राहक आणि तपास यंत्रणांना धोका देण्यासाठी चीनमधील फटाके उत्पादक कंपन्यांनी आपल्या उत्पादनावरील “मेक इन चायना’ मार्क देखील काढून टाकले आहे. महसूल विभागातील गुप्तचर संचालनालयाचे संचालकांनी (डीआरआय) तुघलकाबाद इन लँड कंटेनर डेपोमध्ये छापा मारला, त्यानंतर ही माहिती समोर आली. या ठिकाणी कोटी रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले. रविवारच्या आधी देखील पाच दिवसांतच विविध ठिकाणांवरून ५५ कोटी रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले असल्याची माहिती या वेळी समोर आली. तस्करी च्या माध्यमातून १५०० ते २००० कोटी रुपयांचे चिनी फटाके देशात येत असल्याचा अंदाज आहे. अनेक व्यावसायिकांनी दिवाळीसाठी ऑगस्ट महिन्यातच फटाके आयात केले असल्याचे दिल्लीतील व्यापाऱ्याने सांगितले.
समुद्री मार्गाने येतात चिनी फटाके, दरवर्षी २००० कंटेनर येतात
३५% फटाक्यांची विक्री दिवाळीत
चिनी फटाके : फुटण्याचा धोका जास्त
चिनीफटाके पोटॅशियम क्लोरेट आणि परक्लोरेटसारख्या स्वस्त केमिकलचा वापर होतो. जास्त तापमानात हे फटाके फुटण्याची शक्यता असते. पर्यावरणालादेखील जास्त नुकसान होते. यामुळेच या फटाक्यांवर भारतात बंदी आहे. भारतात तयार होणाऱ्या फटाक्यात पोटॅशियम नायट्रेट आणि अॅल्युमिनियम पावडरचा वापर केला जातो. यामुळे ते चीनच्या तुलनेत महाग असतात.
बाजारात दिवाळीत ९० % चिनी वस्तू
दिवाळीमध्ये९० % वस्तू चिनी असतात. यामध्ये भेटवस्तू, सजावटीचे सामान, गृहोपयोगी वस्तू, विजेचे बल्ब आणि लायटिंग, लाकडापासून बनवलेल्या देव-देवतांच्या मूर्ती यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...