आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात वर्षाला 4 लाख कोटींचे प्रॉडक्ट विकतो चीन, तणाव वाढल्यास होईल नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत- चीनदरम्यान सध्या सीमेवर तणाव आहे. चीन सातत्याने भारताला धडा शिकवण्याची धमकी देत आहे, परंतु असे करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. याचे कारण भारतातून चीनला होणारी रग्गड कमाई हेच आहे. चिनी कंपन्या वर्षाला भारतातून जवळजवळ 4 लाख कोटी रुपयांची उत्पादने विकतात. तर भारत चीनला केवळ 68 हजार कोटी रुपयांची उत्पादने देतो. चीनमधून होणारी आयात स्वस्त असल्याने भारतीय बाजारासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच तणाव वाढला तर भारतासमोरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
दोन्ही देशांचे नुकसान
- अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी यांच्या मतानुसार, तणाव वाढला तर दोन्ही देशांचे मोठे नुकसान होईल. यात भारताचेच जास्त नुकसान आहे.
- ते म्हणाले की, अशा परिस्थितीत भारताला सुरक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. यामुळे ग्रोथ कमी होईल.
- भारताच्या तुलनेत चीनची जीडीप 5 पट मोठी आहे. त्यामुळे भारताला सतर्क राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
 
भारतासमोर असतील या समस्या
- गुरुस्वामी म्हणाले की, भारत कॉम्प्युटर, स्मार्टफोन, आयपॅड, केमिकल आदींसाठी बहुतांश चीनवरच अवलंबून आहे. यामुळे इंपोर्टसाठी इतर मार्केटचा शोध घ्यावा लागेल. परंतु चिनी वस्तू स्वस्त असल्याने भारताला असे करणे कठीण जाईल.
- तणाव वाढल्यास भारताला आपली जीडीपीची ग्रोथ कायम ठेवण्यात अडचणी येतील. याशिवाय भारतातून चीनला हिरे, मोती आणि दागिने, पेट्रोलियम, कापूस यांची निर्यात होती. वाद चिघळल्यास भारताला इतर बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल.
 
चीनलाही भारतीय बाजार जाण्याची तितकीच चिंता
- भारतात मोठ्याप्रमाणावर निर्यात होत असल्याने चीनमध्येही चिंतेचे वातावरण आहे. चिनी सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सने नुकतीच यासंबंधीच्या रिपोर्टवर चिंता व्यक्त केली होती.
- एक्स्पोर्टसाठी भारतीय बाजारावरील अवलंबित्व चीनसाठी धोक्याचे असल्याचे त्यात छापून आले होते. भारताने जर चिनी उत्पादनांवर बंधने लादली, तर याचा चीनला मोठा झटका बसून व्यापारावर विपरीत परिणाम होईल, असेही त्यात म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...