आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comapanies Eyes On Social Media For Human Resource

मनुष्यबळ निवडीसाठी सोशल मीडियावर कंपन्यांची नजर, ९० % कंपन्या करणार नवी भरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी वाढत असून मंगळवारी कामगार विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०१४-१५ दरम्यान देशातील आठ क्षेत्रांत ५.२१ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. २०१३-१४ मध्ये शेवटच्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मार्चदरम्यान ३६,००० नोकऱ्या कमी झाल्या होत्या.

या अहवालानुसार २०१३-१४ मध्ये एकूण २.७६ लाख नोकरीच्या संधी होत्या. तोच या वर्षी सव्वापाच लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सरकारच्या अहवालानुसार जानेवारी - मार्च २०१५ मध्ये ऑक्टोबर - डिसेंबर २०१४ च्या तुलनेत कामगारांच्या सरळ सेवेतील रोजगारात १५,००० रोजगार वाढले आहेत, तर करारावरील नोकऱ्यांमध्ये ४९,००० वाढ झाली आहे.
दुसरीकडे ज्या तेजीने नोकऱ्यांची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात कुशल कामगार मिळण्यास अडचण येत आहे. यामुळेच देशातील ९५ टक्के संस्था सध्या अशा कुशल नोकरदारांचा शोध घेत आहे. यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त संस्थांनी यासाठी त्यांचे बजेट देखील वाढवले आहे.

सर्वात जास्त नोकऱ्यांच्या संधी वडोदरामध्ये : ‘टॅलेंट' नावाच्या या अहवालानुसार ज्या संस्थांचा सर्व्हे करण्यात आला, त्यांच्यातील अर्ध्यापेक्षा जास्त संस्थांनी यासाठी निधीची तरतूददेखील वाढवली आहे, तर १५ टक्के संस्थांनी ५० टक्के कुशल मनुष्यबळ शोधण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला आहे. देशात सर्वात जास्त नोकऱ्यांच्या संधी वडोदरामध्ये असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जुलैमध्ये ५५ टक्के तर ऑगस्टमध्ये ८२ टक्के संधी वाढल्या आहेत. यामध्ये सर्वात कमी संधी जयपूरमध्ये उपलब्ध आहेत.

नोकरीच्या संधी
उत्पादन आणि निर्मिती ८६%
बँकिंग-फायनान्स-विमा ६९%
दूरसंचार ६४%
माहिती व तंत्रज्ञान ५८%
किरकोळ विक्री ५७%
(स्रोत : मॉन्सटर डॉट कॉम)

या क्षेत्रात वाढ
क्षेत्र नोकरी
माहिती तंत्रज्ञान ३७,०००
वस्त्रोद्योग २४,०००
ऑटोमोबाइल २०,०००

या क्षेत्रात घट
चर्मोद्योग ८,०००
आभुषणे ६,०००
वाहतुक/हातमाग २,०००

या शहरांमध्ये नोकऱ्या
शहर मॉनस्टर
बडोदा ८२%
पुणे ४९%
मुंबई ४६%
चेन्नई ३५%
कोलकाता २८%
दिल्ली २८%
हैदराबाद ४२%
(स्रोत : मॉन्सटर डॉट कॉम)

एप्रिल ते सप्टेंबर २०१५ पर्यंत नोकरी
माहिती तंत्रज्ञान १४,६०५
बँकिंग व फायनान्स १३,७६५
औषधनिर्माण ११,०२७
बीपीओ, आईटीईएस ८,८६४
एफएमसीजी ८,८२१
मीडिया, एंटरटेनमेंट ६,९८२
दूरसंचार ५,४२५
ऑटोमोबाइल ४,८९६
ऑईल आणि वायू ४,७०६
(स्रोत : नोकरी डॉट कॉम)