आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमोडिटी बाजाराचे नियंत्रण सेबीकडे, विदेशी गुंतवणुकीला मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कमोडिटी फ्यूचर्स बाजारात लवकरच बँका आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) पैसे लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यात नवी उत्पादनेदेखील आणण्यात येणार असल्याची माहिती सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सोमवारी दिली.
कमोडिटीज रेग्युलिटी बॉडी एफएमसी (फॉरवर्ड मार्केट कमिशन)ला सोमवारी कॅपिटल मार्केट वाचडॉग म्हणजचे सेबीमध्ये समाविष्ट करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी शेअर बाजारात बेल वाजवून याची अधिकृत घोषणा केली. यामुळे कमोडिटी बाजाराचे नियंत्रण आता सेबीच्या हातात आले आहे.