आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर विभागाचा अलर्ट: नोटबंदीतील डिपॉझिट रकमेचा स्रोत सांगा, अन्यथा द्यावा लागेल टॅक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही नोटबंदीदरम्यान म्हणजेच 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान बँक खात्यांमध्ये रोख जमा केली असेल, तर यावरही तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या जमा केलेल्या रकमेचे स्रोत तुम्हाला पुराव्यानिशी द्यावे लागतील, अन्यथा प्राप्तिकर परताव्यात या रकमेलाही समाविष्ट करावे लागणार आहे. असे न केल्यास प्राप्तिकर विभाग तुमच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. 
 
या वेळी कॅश डिपॉझिटची डिटेलही मागितली...
- इन्कम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने या वेळी इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये नोटबंदीदरम्यान केलेल्या कॅश डिपॉझिटचीही डिटेल मागितली आहे.
- Cleartax चे चीफ एडिटर आणि सीए प्रीती खुराणा यांनी divyamarathi.com ला सांगितले की, तुम्ही नोटबंदीदरम्यान बँक खात्यांत जी काही कॅश डिपॉझिट केली असेल, इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ती कॅशही ध्यानात घ्यावी लागेल. जर तुम्ही आयकर विभागाला या रकमेचे स्रोत सांगू शकला आणि हे सिद्ध करू शकला की, यावर टॅक्स अगोदरच दिलेला आहे तर ठीक, अन्यथा हा पैसा इन्कममध्ये दाखवावा लागेल आणि त्यावर टॅक्सही द्यावा लागेल.
 
कॅश डिपॉझिट लपवल्यास अडचणीत याल...
- जर एखाद्या व्यक्तीने आयटी रिटर्नमध्ये नोटबंदीदरम्यान जमा केलेल्या कॅश दाखवत नसेल, तर संबंधित व्यक्तीची लपवाछपवी आयटी डिपार्टमेंट आपल्या नोंदींशी पडताळून उजेडात आणेल. यात रिटर्न फाइल करणाऱ्यावर कारवाई होईल.
 
आयकर विभागाने केले अलर्ट
- आयकर विभागाने याबाबत वृत्तपत्रांत जाहिरात देऊन लोकांना अलर्ट केले आहे. विभागाने नोटबंदीदरम्यान बँकेत जमा केलेल्या कॅशचा योग्य खुलासा करण्याबाबत म्हटले आहे. तथापि, 31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न भरता येईल.
बातम्या आणखी आहेत...