आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporate Earnings To Grow Only 2% In December Quarter: Crisil

कंपन्यांच्या व्यवसायात डिसेंबर तीमाहीत टक्के वाढ : क्रिसिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑक्टोबर-डिसेंबरया तीन महिन्यांत कंपन्यांचा व्यवसाय केवळ दोन टक्क्यांची वाढण्याचा अंदाज क्रिसिल रिसर्चच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपन्यांचा व्यवसाय पाच टक्क्यांच्या गतीने वाढला होता. कमोडिटीमध्ये कमी झालेल्या किमती, कमजोर मागणी आणि ग्रामीण भागात कमी झालेल्या विक्रीमुळे व्यवसायाची गती कमी झाली असल्याचा दावा क्रिसिलच्या वतीने करण्यात अाला आहे.
स्टील, पेट्रोकेमिकल आणि कृत्रिम फायबर सारख्या क्षेत्राला सोडले तर इतर व्यवसाय (महसूल) वाढवण्याच्या गतीत सुधारण्याची अपेक्षा आहे. व्याज, डेप्रिसिएशन, कर आणि अॅमोर्टायझेशन (एबिटा) च्या आधी कंपन्यांच्या उत्पन्नाची गती ५.८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांत ही गती चार टक्के होती.
क्रिसिलच्या वतीने हा निष्कर्ष राष्ट्रीय शेअर बाजारात ७० टक्के भागीदारी असलेल्या ६०० कंपन्यांच्या विश्लेषणानंतर काढण्यात आला आहे. यामध्ये आर्थिक, आॅइल आणि गॅस कंपन्यांचा समावेश आहे.
दोनअंकाची वाढ : शहरातवरलक्ष केंद्रित केलेल्या ऑटोमोबाइल, मीडिया, रिटेल आणि टेलिकॉमसारख्या क्षेत्रातील व्यवसायात दोन अंकाची वाढ होणार असल्याची माहिती क्रिसिल संशोशनाचे वरिष्ठ संचालक प्रसाद कोपरकर यांनी दिली. अमेरिकेत निर्यात वाढल्यामुळे मध्यम फार्मा कंपन्यांच्या व्यवसायात वाढीची अपेक्षा त्यांनी वर्तवली.
वीजउत्पादन क्षेत्रात चांगले प्रदर्शन :डिसेंबरपर्यंत जाहीर होणाऱ्या तीमाही आकडेवारीत वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायात सात ते आठ टक्क्यांची वाढ दिसण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून अनेक नवीन योजना सुरू झाल्या असून मागणी वाढल्यामुळे असे झाले असल्याचे मत क्रिसिलने व्यक्त केले आहे.

चेन्नईचा परिणाम
भारतीय कंपन्या सध्या कमी मागणीमुळे अडचणीत आल्या आहेत. गुंतवणुकीत वाढ आणि प्रतिस्पर्धीच्या किमतीचा परिणाम दिसत आहे. या व्यतिरिक्त चेन्नईमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणामदेखील डिसेंबरच्या आकडेवारीवर परिणाम करेल. यामध्ये ग्राहकोपयोगी, आयटी, अभियांत्रीकी आणि ऑटो कम्पोनेंट क्षेत्राच्या कंपन्यांचा समावेश आहे.