आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Credit Suisse Survey India Customer Is Very Hopeful

भारतीय ग्राहक सर्वात जास्त आशावादी, क्रेडिट सुइसचा सर्व्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत असले तरी भारतीयांच्या मनातील उत्साह कमी झालेला नाही. केडिट सुइसच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेच्या निष्कर्षात भारतीय ग्राहक सर्वात जास्त आशावादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगातील देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये भारतीयांनी भविष्यात आर्थिक स्थिती सुधारण्याची आशा व्यक्त करून महागाई कमी होण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
क्रेडिट सुइसच्या वतीने करण्यात आलेल्या "उदयोन्मुख ग्राहक गुणांकन-२०१६' या सर्व्हेत भारतानंतर चीन आणि सौदी अरेबियाचा क्रमांक आहे. या दोन्ही देशांना संयुक्त दुसरे स्थान देण्यात आले आहे. भारत २०१५ मध्येदेखील पहिल्या स्थानावर होता. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर धोरणांमुळे काही लोकांमध्ये निराशेची भावना असली तरी िवकसनशील देशांमध्ये भारतीय ग्राहकांची आशा अजूनही कायम आहे. विशेषकरून उत्पन्नाबाबत येथील नागरिक जास्त आशावादी असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व्हेत सहभागी झालेल्या अनेक भारतीयांनी उत्पन्न वाढले असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी उत्पन्नात जास्त वाढ होण्याची अपेक्षा कमी आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर लोकांना खूप अपेक्षा होत्या. आता दोन वर्षांनंतर त्यांचा उत्साह कमी झाला आहे. तरीदेखील इतर विकसनशील देशांच्या तुलनेेत येथील लोकांना जास्त विकासाची अपेक्षा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे विकसनशील देशांमधील नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
भारतीयांच्याउत्पन्नात % वाढ : सर्व्हेमध्येविविध वयानुसार उत्पन्नाबाबतच्या माहितीचा आढावा घेण्यात आला आहे. भारतात २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये उत्पन्नात सर्वात जास्त चार टक्के वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीच्या बाबत इतर देशांमध्ये तुर्की, चीन, सौदी अरब आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. ब्राझीलमधील नागरिकांचे उत्पन्न ५.५ टक्क्यांनी कमी झाले आहे.

रशिया सर्वात मागे
-भारत,२-चीन, ३- सौदी अरेबिया, - इंडोनेशिया, - तुर्की, - मेक्सिको, - ब्राझील, ८- दक्षिण अाफ्रिका, ९- रशिया