आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआरआर ४% ठेवून ‘जैसे थे’ परिस्थिती: आरबीआय द्वैमासिक पतधोरण आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँक अाॅफ इंडियाने द्वैमासिक पतधाेरणाचा अाढावा घेताना रेपाेरेट ७.२५, रिव्हर्स रेपाे रेट ६.२५ व बँक रेट ८.२५ अाणि सीअारअार ४ टक्के तसेच ठेवून ‘ जैसे थे’ परिस्थिती ठेवली अाहे.

३१ मार्च २०१६ च्या काळात ६ टक्के-चलनवाढ, महागाईवाढीचा दर राहणार
व्याजदर कपातीची अपेक्षा ठेवणाऱ्या उद्याेग, व्यापार व बँकिंग क्षेत्रात थाेडेसे नैराश्य अाले अाहे. हे ‘जैसे थे धाेरण’ चालू ठेवणारा अाढावा, केवळ तेवढेच सांगत नाही तर ‘जे अाहे ते अाहे’ जे जसे अाहे, ते तसेच अाहे व यातूनही काही ठिक हाेईल अशी अपेक्षा सांगत अाहे.

त्यातच भारतीय वित्तसंहिता (अायएफसी) ही बँकेच्या धाेरणात्मक निर्णयाच्या अधिकारावर मर्यादा घालणारी बँक व सरकार यांची समिती येऊ घातली अाहे, त्या समीतीत बँकेचे फक्त तीन व सरकारचे चार सदस्य असणार अाहेत व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांना ‘नकाराधिकार’ नसण्याची शक्यता अाहे. ह्या परीस्थितीत डाॅ.राजन यांनी व्याजदर कपातीसाठीचा दबाव न मानता ‘जैसे थे’ ठेवले अाहेत.

१ अार्थिक परिस्थिती
बँकेने अाढावा घेताना, अमेरिकन अर्थव्यवस्था सुधारत अाहे, ग्रीसच्या अार्थिकसंकटाने ग्रीस व युराेप व त्यातून भारतासह अन्य देशांवर परिणाम झाला व हाेणार असे सूचित केले अाहे. त्याचबराेबर चीनची अार्थिकवाढीचा दर मंदावला अाहे. व तेथील शेअरबाजारामधील मंदीचा फटका सर्वदूर शेअर बाजारांवर पसरला अाहे.

पण यातून बांॅड मार्केटमध्ये उतार येऊन परतावा वाढला अाहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, व्याजदर वाढीचा शेअरबाजारावर परिणाम हाेतोय. त्यातून विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांतून गुंतवणुकी, भांडवल इतरत्र फिरण्याचा परिणाम हाेत अाहे.

२ भारतीय अर्थव्यवस्था
वाढत, विकसित हाेत असली तरी अनेक अडचणी येत अाहेत. मध्यंतरी जनधन, सीपीअाय, ग्राहक किंमत निर्देशांक वर गेला. ही काळजीची बाब अाहेच. देशभर पाऊस कमी समाधानकारक नाही. पीक परिस्थिती कठीण अाहे. त्यातच कापूस, साखर यांच्या अांतरराष्ट्रीय बाजारात किंमती उतरल्या अाहेत, काही देशांतील मागणी कमी झाल्यामुळे निर्यात घटली अाहे. पण इंधन क्रूड अाॅइलच्या किंमतीत उतार असल्याने यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत व्यापारी तूट व त्यामुळे करंट अकाऊंट डिफिसिएटचे प्रमाण कमी हाेत अाहे.

३ अंदाज व अपेक्षा
सध्याच्या परिस्थितीत, बँकेने ३१ मार्च २०१६ च्या काळात ६ टक्के-चलनवाढ, महागाईवाढीचा दर राहील अशी अपेक्षा ठेवली अाहे. तसेच अार्थिकवाढीचे वातावरण संथगतीने सुधारत अाहे. पण खासगी क्षेत्रात गुंतवणुकी वाढल्या की, अापल्या अार्थिकवाढीला वाव, चालना मिळेल, त्यामुळे २०१५-१६ मध्ये अार्थिकवाढीचा दर ७.६ टक्के राहील. यासाठी गरज अाहे ती नियाेजनाची व कार्यवाहीची. पाॅवर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त उत्पादनक्षमतेचा वापर झाला पाहिजे. वाहन क्षेत्रात मागणी वाढतांना दिसत अाहे.

पण एकूणच सर्वक्षेत्रात उठाव वाढायला पाहिजे. यासाठी सरकारी प्रकल्पातील गुंतवणुकीने प्राेत्साहक वातावरण व्हायला पाहिजे. उर्वरित काळात बऱ्यापैकी पाऊस पडला तरी यावर्षी कृषीक्षेत्रातील उत्पादनात तूट अन् उत्पादकांना उत्पन्नात घट येण्याची शक्यता अाहे.
कृषीक्षेत्राच्या वाढीचा दर किमान ३ टक्के ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अाहे. त्याचबराेबर अन्य उत्पादनक्षेत्रात उत्पादनवाढीचा दर वाढण्यासाठी हि प्रयत्न करण्याची गरज अाहे.
हे सारे सरकारी पातळीवर, कृषीक्षेत्रात,

उद्याेगक्षेत्रात केले जावे म्हणजे मग येणाऱ्या काळात महागाईवाढीचा दर खालीखाली येईल व अार्थिकवाढीचा दर ७.५०, ८, ८.५० टक्के असा वर वर जाईल. अाज मात्र
अाहे ते अाहे, त्यात व्याजदर धाेरण, पतधाेरण व चलनधाेरण ‘ जैसे थे’ ठेवणे भाग व याेग्य असल्याचे बंॅक सांगत अाहे.