Home »Business »Industries» Daughters Of Billionaires

या आहेत अब्जाधीशांच्या मुली, यशस्वीपणे सांभाळत आहेत वडिलांचे बिझनेस

नुकत्याच झालेल्या डॉटर्स डे च्या निमित्ताने आम्ही आज तुम्हाला अब्जाधिशांच्या मुलींबाबत माहिती देणार आहोत.

दिव्य मराठी वेब टीम | Sep 25, 2017, 16:07 PM IST

नवी दिल्ली - एक काळ होता, जेव्हा मुलींना ओझे समजले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. समाजातील एक मोठा भाग किंवा बहुतांश लोक मुलीला ओझे समजत नाहीत. उलट याच मुली आता वडिलांचा अभिमान बनल्या आहेत. त्यांनी संधी मिळाली की, त्या आपण काय करू शकतो हे दाखवून देत आहेत. उद्योग क्षेत्राचा विचार करता आज अशा अनेक मुली आहेत, ज्या वडिलांच्या उद्योगाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. त्यांनी स्वतःला याठिकाणीही सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या डॉटर्स डे च्या निमित्ताने आम्ही आज तुम्हाला अब्जाधिशांच्या मुलींबाबत माहिती देणार आहोत.

अवनी बियाणी
बिग बाजार फेम फ्युचर ग्रुपचे फाऊंडर किशोर बियाणी यांची मुलगी अवनी सध्या चिफ एक्झिक्युटीव्ह आहे. वडिलांचा उद्योग सांभाळताना काळाबरोबर बदल करणे तिला सहज जमते. भारतीयांमध्ये चवीबद्दल असलेली आवड लक्षात घेऊन तिने फुडहॉलची सुरुवात केली. त्यात हॉलंडहून आलेले 2400 रुपये किलोचे टोमॅटो आणि पेरूहून आलेले 1800 रुपये किलोचे अॅव्हेकॅडोही मिळतात. अवनीची लहान बहीण अशनीही कंपनीत मोठी जबाबदारी सांभाळण्याच्या तयारीत आहे. फ्युचर रिटेलचे मार्केट कॅप 26560.04 कोटी एवढे आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर अब्जाधीशांच्या मुलींबाबत..

Next Article

Recommended