आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ग्राहकी विश्वास सूचकांकामध्ये घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये (एप्रिल ते जून) महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय “ग्राहकी आत्मविश्वास सूचकांक’ घसरला असल्याचे मत बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवणारी कंपनी नीलसन यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय ग्राहकी सूचकांक जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाेेच्च पातळीवर होता. या पातळीवरून ताे आता खाली आला असल्याचा दावा कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तिमाहीमध्ये हा सूचकांक १३४ अंकाच्या उच्चांकावर होता. मात्र, एप्रिल ते जून दरम्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून आता तो १२८ अंकावर आला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वर्ष २०१६ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारतातील ग्राहकी आत्मविश्वास सूचकांक सहा अंकांनी घसरला आहे. गेल्या आठ तिमाहीमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीचा विचार करता भारत इतर देशांच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर होता. मात्र, आठ तिमाहीनंतर प्रथमच भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताची जागा फिलिपाइन्सने घेतली असून त्याने १३२ अंक प्राप्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...