आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल वाॅर्मिंगने दूध उत्पादनात घट, 45 व्या डेअरी उद्योग परिषदेत तज्ज्ञांचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील सर्वात माेठा दूध उत्पादक असलेल्या अापल्या देशातील डेअरी उद्याेगात सहा काेटी ग्रामीण लाेकांना रोजगार पुरवला जात अाहे. परंतु ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा अाता या उद्याेगाला बसू लागल्या असून हवामान बदलामुळे पुढील चार वर्षांत दुधाचे उत्पादन दरवर्षी ३ काेटी टनांनी कमी हाेण्याचा अंदाज इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केला.  

डेअरी उद्याेगात  दीड काेटीपेक्षा शेतकरी कार्यरत असून त्यामध्ये जवळपास ४६ लाख महिला कार्यरत अाहेत. डेअरी व्यवसाय अधिक नफादायी हाेण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक रक्कम मिळाली तरच या व्यवसायात टिकून राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी स्वामिनाथन समितीने हाच सल्ला दिला अाहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित क्षेत्रात अाणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी सहकारी अाणि खासगी कंपन्यांनीदेखील या शेतकऱ्यांना त्यांची रक्कम वेळेत परत केली पाहिजे, असे मतही नरके यांनी व्यक्त केले. 
 
भारतीय डेअरी असोसिएशनच्या (पश्चिम विभाग) वतीने गोरेगाव येथील एनएसई संकुलात   ‘४५वी  डेअरी उद्योग परिषद’ भरविण्यात अाली अाहे, त्या वेळी ते बाेलत हाेते.  परिषदेचे उद््घाटन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप राठी यांच्या हस्ते झाले.  डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अरुण पाटील,  उपाध्यक्ष सुभाषचंद्र मांडगे, महासचिव राजेश लेले अाणि दूध व्यवसायातील मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.  

गरम वातावरणात दूध लवकर खराब हाेत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम हाेत अाहे. विपरीत वातावरणाचा पशुपालनावर तसेच त्यांच्या खाद्यावरदेखील परिणाम हाेत अाहे. त्यामुळे हवामानातील बदलाने जगापुढे माेठे आव्हान अाणि त्याला ताेंड कसे द्यायचे यावर गंभीर चर्चा हाेण्याची गरज असल्याकडे नरके यांनी लक्ष वेधले.  

दोन वर्षांत ६.५% वाढ : राठ  
राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप राठ म्हणाले की, गेल्या वर्षात देशात १५ काेटी ६० लाख टन दुधाचे उत्पादन  झाले. देशातील दूध उत्पादनात गेल्या दाेन वर्षांत वार्षिक ६.५ टक्क्यांनी वाढ हाेत असून दुधाच्या दरडोई उपलब्धतेत ही तीन पट वाढ झाली अाहे.  महाराष्ट्रात सलग तीन वर्षे झालेल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतीबरोबरच डेअरी उद्याेगाला माेठा फटका बसला.
 
चारा महाग झाल्याने दूध उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली. या गाेष्टी लक्षात घेता शेतकऱ्याला चांगली किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमतीनुसारच राज्य सरकारने दूध खरेदी करावी, असे मत व्यक्त केले.  
 
डेअरी क्षेत्रासाठीच्या तरतुदीचे स्वागत   
देशातील डेअरी उद्याेगाच्या विकासासाठी केंद्र सरकारने पुढील तीन वर्षांसाठी केलेल्या ८००० काेटी रुपयांच्या तरतुदीचे दुग्ध व्यवसायातील तज्ज्ञांनी स्वागत केले अाहे. देशातील  दुधाची मागणी १९० दशलक्षापर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...