आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार कमी झाल्याने घरांची मागणी घटणार, आयटी क्षेत्राबाबत जेएलएलचा अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयटी क्षेत्रातील रोजगार जात असल्यामुळे नवीन घरांची मागणी कमी होत आहे. मालमत्ता कन्सल्टन्सी संस्था जोन्स लांग लासेलने (जेएलएल) अापल्या अभ्यास अहवालात हा दावा केला आहे.
 
या अहवालानुसार बंगळुरू, हैदराबाद, पुणे, नवी मुंबई, नोएडासारख्या आयटी हबमध्ये नोकरी जाण्याचा परिणाम दिसेल. बंगळुरू आणि पुणे ही दोन्ही शहर नवीन नोकरीसाठीच नाही तर नवीन घरांच्या निर्मितीसाठीही आयटी कंपन्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात अलीकडेच आलेल्या “मेल्टडाऊन’चे या शहरातील घरांच्या मागणीसाठीही आव्हान ठरणार आहे. 
 
उद्योग संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यानुसार आयटी आणि बीपीओ क्षेत्रात १६,००० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. यात ४० लाख कर्मचारी काम करतात. मात्र, आता यातील मध्यम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याचे संकट आले आहे.
बातम्या आणखी आहेत...