आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defencies Of Economists In India Governor Raghuram Rajan

भारतात अर्थशास्त्रज्ञांची कमतरता - गव्हर्नर रघुराम राजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात चांगल्या अर्थतज्ज्ञांची कमतरता असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि कार्यकारी मंडळात देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील, असे अर्थतज्ज्ञ देशात कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी मुंबईमध्ये आयोजित एका परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाचा विकासदर ९ टक्के करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पुरवठा सुधारणे आणि मागणी वाढवणेदेखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विकासाचा मार्ग वास्तविक खूप अवघड असतो. त्यामुळे फक्त लोकांना लुभावणाऱ्या धोरणांचा अवलंब करू नये, असा सल्लादेखील त्यांनी सरकारला दिला.


असल्याचे मत राजन यांनी व्यक्त
केले. यामुळे पुरवठा वाढेल तसेच मागणी वाढण्यासाठी मदत होईल. पुरवठा आणि मागणी वाढवण्यासाठी सरकारला विविध बाबींवर काम करावे लागणार आहे. किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरवठ्यामधील अडचणी दूर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जगभरातील जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था सध्याच्या स्थितीतच मंदीचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रमुख केंद्रीय बँकांमध्ये जास्त समन्वयाची आवश्यकता असल्याचे मत राजन यांनी यावेळी व्यक्त केले. या मागे त्यांचा सरळ इशारा हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशाकडे म्हणजेच चीन आणि युरोपकडे होता. या वेळी चीनचा विकासदर सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. २००८-०९ च्या मंदीनंतर प्रथमच चीन मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तर युरोप अद्यापही मंदीपासून पूर्णपणे मुक्त झालेला नाही. जी-२० कार्यकारी मंडळात भारत आणि कॅनडाला सहअध्यक्षता करावी लागणार आहे. कॅनडाने सात चांगले अर्थतज्ज्ञ या कामी लावले असून ते त्यांचे धोरणदेखील पुढे राबवत आहेत. मात्र, भारताकडून तज्ज्ञ कमीच आहेत.

करप्रणाली पारदर्शी असावी
करप्रणालीत पारदर्शकता आणि बिझनेस करण्यासाठी अनुकूल वातावरण असले तरच ‘मेक इन इंडिया’ अभियान यशस्वी होऊ शकते, असे मत राजन यांनी व्यक्त केले. गेल्या तारखेपासून कर लागू केल्यास सरकारला देश-विदेशात अनेक खटले लढावे लागण्याची शक्यता आहे.

लघुउद्योगांना चालना देणे उपयोगी नाही
रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी लघु उद्योगांची स्थापना करणे हा एक मुख्य मार्ग होता. मात्र, दुसऱ्या देशांकडून स्पर्धा मिळताच ते फेल गेले. त्याऐवजी आपण मोठ्या उद्योगांना संधी दिली असती तर चांगले असते. ते जास्त रोजगार देऊ शकतात. उद्योगांना जसे कुशल कामगार पाहिजे तसे मिळत नसल्याची मोठी समस्या सतावत आहे. त्यामुळे कामगारांना कुशल करणे आवश्यक आहे. येथे सरकारमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्यामध्ये क्षमताही नाही आणि त्यांना तसे प्रशिक्षणही देण्यात येत नाही.