आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे, दागिने उद्याेगांसाठी सामाईक ‘जीएसटी’, जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिरे अाणि दागिने उद्योगांसाठी सरसकट एक टक्का सामाईक वस्तू अाणि सेवाकराची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अाॅल इंडिया जेम्स अॅँड ज्वेलरी फेडरेशनने केली अाहे. सामाईक करामुळे सर्व दागिने उत्पादक एका छताखाली येण्यास मदत हाेऊन हे क्षेत्र अधिकाधिक संघटित हाेण्यास मदत हाेऊ शकेल याकडेही संस्थेने लक्ष वेधले अाहे.

एकसारख्या करामुळे हिरे अाणि दागिने उद्याेगाला ‘मेक इन इंडिया’ माेहीम तळागाळापर्यंत राबवण्यास मदत हाेऊ शकेल तसेच हे क्षेत्र अाणखी संघटित हाेऊ शकेल. यासाठी एक टक्का जीएसटीची अंमलबजावणी करण्याची गरज अाहे. हिरे अाणि दागिने उद्याेग संघटित झाल्यास प्रस्तावित सुवर्ण मुद्रीकरण याेजनेचीदेखील यशस्वीपणे अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे फेडरेशनचे अध्यक्ष श्रीधर जी. व्ही. यांनी संघटनेच्या दहाव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बाेलताना सांगितले.

देशामध्ये खास दागिन्यांच्या उत्पादनासाठी एक केंद्र निर्माण करून दागिने निर्यातीलादेखील चालना देता येऊ शकेल. यासाठी हिरे अाणि दागिने निर्यात प्राेत्साहन परिषदेच्या संपर्कात असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.

परिषदेचा दर्जा द्या
मेक इन इंडिया, सुवर्ण मुद्रीकरण याेजना, हाॅल मार्किंग बंधनकारक करणे अादी विविध उपक्रमांमध्ये हिरे अाणि दागिने क्षेत्रांचा समावेश केल्यामुळे सुलभ व्यवसाय (इझ अाॅफ डुइंग बिझनेस) करण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगून श्रीधर यांनी या क्षेत्राला राष्ट्रीय हिरे अाणि दागिने परिषदेचा दर्जा द्यावा, अशी फेडरेशनची मागणी असल्याकडे लक्ष वेधले.