आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्गुंतवणुकीचे लक्ष्य अधांतरीच; अपुरा पाऊस, शेअर बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या वर्षी अपुरा पाऊस हाेण्याच्या अंदाजामुळे चिंताग्रस्त झालेला शेअर बाजार, अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता अादी विविध कारणांमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक कार्यक्रमात अडथळा येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत अाहे. त्यामुळे विद्यमान अार्थिक वर्षातील ६९,५०० काेटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठता येईल की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत अाहे.

भांडवल बाजारातील सध्याचे वातावरण बघता दुस-या सहामाहीत त्यात काही लक्षणीय सुधारणा हाेईल असे वाटत नाही. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून ६९,५०० काेटी रुपयांचा निधी उभारण्याचे २०१५-१६ वर्षातील लक्ष्य गाठण्याबाबत शंका असल्याचे मत अधिकृत सूत्रांनी व्यक्त केले. अर्थमंत्रालयाने सार्वजनिक कंपन्यांमधील सरकारी भागभांडवलाची विक्री करून ६९,५०० काेटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य डाेळ्यासमाेर ठेवले अाहे. यापैकी ४१,००० काेटी रुपयांचानिधी सार्वजनिक कंपन्यांमधील अल्प भांडवलाची विक्री करून, तर धाेरणात्मक भागभांडवल विक्रीच्या माध्यमातून २८,५०० काेटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार अाहे.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची व्याजदरवाढही यात अडथळा ठरणार असून त्यामुळे विदेशी भांडवलाचा अाेघ भारताबाहेर जाण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक जूनमध्ये किंवा पुढच्या वर्षात व्याजदर वाढवण्याचा विचार करीत अाहे.
भांडवलाची विक्री
निर्गुंतवणूक खात्याने सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांमधील अल्प भांडवलाची विक्री करून जवळपास ५० हजार काेटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळवली अाहे. परंतु यंदाच्या अार्थिक वर्षात केवळ रुरल इलेक्ट्रिफिकेशन काॅर्पाेरेशन या एकाच कंपनीतील भांडवली हिश्शाची विक्री करण्यात यश मिळाले अाहे.
‘एचएमटी’ रडारवर
एचएमटी वाॅचेस, एचएमटी चिनार, एचएमटी बेअरिंग यांच्याबराेबरच तुंगभद्र स्टील, हिंदुस्तान केबल काॅर्पाेरेशन यांच्या निर्गुंतवणुकीतून २२ हजार काेटी रुपयांचा निधी उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय अवजड उद्याेगमंत्री अनंत गिते यांनी गेल्या अाठवड्यात सांगितले.
पाच टक्के भांडवली हिस्सा विक्री हाेणा-या कंपन्या : अाेएनजीसी, भेल, एनटीपीसी
दहा टक्के भांडवली हिस्सा विक्री हाेणा-या कंपन्या : अायअाेसी, नाल्काे, एनएमडीसी लि.