आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारापेक्षा उत्तम कार्यालयीन संस्कृतीला पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोणीही नोकरी का करते असे विचारले तर उत्तर असेल अर्थातच चांगल्या पगारासाठी. पण आता हा कल बदलत असून पगारापेक्षाही त्या कंपनीची रोजगार क्षमता, कामकाज संस्कृती या गोष्टींना नवीन उमेदवार जास्त पसंती देत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. जॉबबझ डॉट इन या संकेतस्थळाने केलेल्या एका पाहणीमध्ये जवळपास ९० टक्के व्यावसायिकांनी केवळ गलेलठ्ठ पगार मिळतोय म्हणून नोकरी स्वीकारणार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

हातामध्ये अगदी दोन किंवा जास्त नोकऱ्या हातात असल्या तरी केवळ कार्यालयीन कामकाज संस्कृती चांगली असलेल्या कंपनीची निवड उमेदवार करत असल्याचे टाइम्सजॉब.कॉमचे मुख्य कामकाज अधिकारी विवेक मधुकर यांनी सांगितले. कामकाज संस्कृतीला चालना देणारी कंपनी पसंत करण्याकडे वरिष्ठ कामगारांचा कल असून ६६ टक्के कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील वातावरण खराब होण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले अाहे.
मनुष्यबळ व्यावसायिकांसाठीही ‘अच्छे दिन’
मनुष्यबळ विभागामध्ये पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण होणार आहे. कारण जवळपास ४५ टक्के कंपन्यांनी नवीन नोकरभरतीसाठी आपल्या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातल्या मनुष्यबळ विकॉस क्षेत्रातील व्यावसायिकांना येणाऱ्या काळात अच्छे दिन येणार आहेत.

नोकरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मायकेल पेज या कंपनीने अलीकडेच केलेल्या एका पाहणीमध्ये जवळपास ६६ टक्के कंपन्यांच्या एचआर विभागाने पुढील १२ महिन्यांत अापले कर्मचारी संख्याबळ वाढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्या तुलनेत जगभरातील अर्ध्याहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी व्यावसायिकांची संख्या वाढवण्याचा विचार केला आहे. या सर्वेक्षणात जगभरातल्या ६५ देशांमधील लघु, मध्यम उद्योगातील कंपन्यांपासून ते अगदी बड्या कंपन्यांमधील २,५०० मनुष्यबळ स्रोत व्यवस्थापकांचे सर्वेक्षण करण्यात आले.