आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊर्जा मंत्रालयाकडून डीबी पॉवरचा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते दैनिक भास्कर समूहाच्या डीबी पॉवर कंपनीचा सन्मान करण्यात आला. डीबी पॉवरचे मुख्याधिकारी पी. के. चक्रवर्ती पुरस्कार स्वीकारताना. - Divya Marathi
ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते दैनिक भास्कर समूहाच्या डीबी पॉवर कंपनीचा सन्मान करण्यात आला. डीबी पॉवरचे मुख्याधिकारी पी. के. चक्रवर्ती पुरस्कार स्वीकारताना.
नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाच्या डीबी पॉवर लिमिटेड कंपनीने २०१०-११ मध्ये छत्तीसगड १२०० मेगावॅटच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची घोषणा करत ऊर्जा क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या क्षेत्रात नवखे असूनही या प्रकल्पाने सर्व महत्त्वपूर्ण कार्ये कमीत कमी वेळेत पूर्ण करून फास्ट ट्रॅक प्रकल्पांमध्ये जागा बनवली. वीज क्षेत्रातील प्रशंसनीय कामगिरीला ओळख देण्याच्या एका व्यापक पुरस्कार योजनेअंतर्गत ऊर्जा मंत्रालयाने डीबी पॉवरला "औष्णिक प्रकल्प जलद पूर्णत्वास नेण्याच्या श्रेणी'मध्ये प्रतिष्ठित "कांस्यपदक' देऊन सन्मानित केले. ३ जून २०१५ रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित एका भव्य समारंभात ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी डीबी पॉवरला हा पुरस्कार प्रदान केला. बायलर टर्बाइन जनरेटरचे कार्य बीएचईएल या सरकारी कंपनीस तर प्रकल्पाचे उर्वरित काम लार्सन अँड टुब्रोला देण्यात आले होते. या गौरवाच्या माध्यमातून डीबी पॉवरने वीज उत्पादन क्षेत्रासाठीच्या नवउद्योजकांसाठी उद्योगाच्या सर्व मान्यतांचा एक अध्याय सुरू केला आहे.