आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PF अकाऊंटवर मोदी सरकारचे चार मोठे निर्णय, तुुम्हाला होईल फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुमचे प्रोव्हिडंट फंड अकाऊंट मॅनेज करणारे ईपीएफओने (एम्प्लॉइज प्रॉव्हिडंंट फंड ऑर्गनायझेशन) नुकतेच चार मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तुमच्या पीएफ अकाऊंटच्या स्वरुपात मोठा बदल झाला आहे. याचा  तुम्हाला कसा फायदा होणार आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

काय आहे मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून ईपीएफओमध्ये एका मुद्द्यावर मोठी चर्चा सुरु होती. त्यावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रॉव्हिडंट फंडचे दोन अकाऊंट असतील. एक कॅश अकाऊंट आणि दुसरा ईटीएफ अकाऊंट. कॅश अकाऊंटमध्ये पीएफची ८५ टक्के रक्कम जमा असेल तर ईटीएफमध्ये १५ टक्के. ईटीएफमधील पैसे ईपीएफओ शेअर मार्केटमध्ये गुंतवणार आहे.

 

काय होईल फायदा
शेअरबाजारमध्ये गुंतविलेला पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये युनिट्सच्या स्वरुपात दिसेल. तुम्ही जेव्हा पीएफचा पैसा काढाल तेव्हा युनिट्सची जी नेट अॅसेल व्हॅल्यू असेल त्याच्या हिशोबाने पेमेंट मिळेल. एवढेच नव्हे तर तुम्हाला दररोज बघता येईल की तुमच्या युनिट्सची व्हॅल्यू कमी झाली आहे की वाढली आहे. तुमच्या ईटीएफ अकाऊंटवर १ एप्रिलपासून युनिट्स क्रेडिट होतील.

 

पेमेंट मिळणे होईल सहज
सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पैसे काढायला गेले तर ईपीएफओची सिस्टिम अशी आहे की पैसे मिळायला बराच अवधी लागतो. त्यामुळे या ऑर्गनायझेनने निर्णय घेतला आहे, की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या प्लॅटफॉर्मवर सेंट्रलाईज पेमेंट सिस्टिम अवलंबणार आहे.

 

काय होईल फायदा
एनपीसीआय प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला त्याच दिवशी पैसे मिळतील, ज्या दिवशी या विभागात तुमची अप्लिकेशन सेक्शन केली जाईल. तसेच ट्रान्झॅक्शन फेल होण्याची शक्यता अगदी शुन्याच्या बरोबर असेल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, ईपीएफओने आणखी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.... असा होईल तुमच्या पीएफ खात्यावर परिणाम....

बातम्या आणखी आहेत...