आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्चेंज हॅक: ४५० कोटी ‘बिटक्वाइन’ चोरीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - हॅकर्स आता ऑनलाइन चलन बिटक्वाइनही चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी १,१९,७५६ बिटक्वाइन चोरण्यात आले. रुपयांमध्ये गृहीत धरले तर याची किंमत ४५० कोटींपर्यंत जाते. चोरीसाठी हॅकर्सनी हाँगकाँगची बिट फायनान्स एक्स्चेंजची साइट हॅक केली. बिटफाइनेक्सचा जगातील सर्वात मोठ्या “बिटक्वाइन एक्स्चेंज’मध्ये समावेश होतो. गेल्या महिन्याभरात येथे डॉलरची सर्वात जास्त ट्रेडिंग झाली होती. हँकिंगची माहिती मिळताच एक्स्चेंजने ट्रेडिंग थांबवली. चलन काढणे आणि टाकण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बिटक्वाइनचे मूल्य २० टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह ५४२ डॉलरवर आले होते. नंतर त्यात सुधारणादेखील दिसून आली. बुधवारी रात्री उशिरा एका बिटक्वाइनची किंमत ५४९ डॉलरच्या जवळपास होती, अशी माहिती “क्वाइन डेस्क’च्या वतीने देण्यात आली आहे. ही हॅकिंग कशा प्रकारे झाली याविषयी एक्स्चेंजचे अधिकारी चाैकशी करत आहेत. पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली असल्याचे एक्स्चेंजचे संचालक जेन टॅकेट यांनी सांगितले. पोलिसांच्या मदतीने ही हॅकिंग कोणी केली याविषयी तपास करण्यात येत आहे. तसेच एक्स्चेंजचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काम पुन्हा सुरू झाल्यानंतर कोणाचे खाते हॅक झाले आणि कोणाच्या खात्यातून पैसे काढले गेले, ते स्पष्ट होऊ शकणार आहे.

सायबर हल्ल्यानंतर आली होती दिवाळखोरी : या घटनेमुळे बिटक्वाइनच्या आधी मोठे एक्स्चेंज असलेल्या माउंट गॉक्सची आठवण झाली. यामध्येदेखील २०१४ मध्ये अचानक गुंतवणूकदारांना पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी सायबर हल्ला तसेच तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले होते. कालांतराने एक्स्चेंजने स्वत: दिवाळखोरी घोषित केली होती.

बिटक्वाइन तंत्रज्ञानात मोठ्या बँकांची गुंतवणूक
बिटक्वाइनला ‘इलेक्ट्रॉनिक मनी’ असेदेखील संबोधले जाते. अमेरिकन एक्स्प्रेस, बेन कॅपिटल, डेलॉय, गोल्डमॅन साक्स, मास्टरकार्ड यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बँकांनी यामध्ये एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त (६,७०० कोटी रुपये) गुंतवणूक केेली आहे. ही गुंतवणूक चलनात नसून चलन बनवणाऱ्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात आहे. नसडॅक या तंत्रंाचा अवलंब करण्याचा विचार करत आहे. फसवणुकीला आळा घालण्यात हे तंत्रज्ञान सक्षम असल्याचे मानले जात असले तरी अशी हॅकिंगची घटना घडली. गेल्या वर्षी अमेरिकेत आयोजित ‘मनी २०२०’ कॉन्फरन्समध्ये २० टक्के लोकांनी पाच वर्षांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अार्थिक सेवांवर सर्वात जास्त परिणाम होणार असल्याचे सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...