आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exports Fall Nearly 6% For 16th Consective Month On Tepid Global Demand

सलग सोळाव्या महिन्यात आयात- निर्यातीत घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये देशातील एकूण निर्यातीत १५.८५ टक्क्यांची घट झाली असून आता निर्यात २६१.१ अब्ज डॉलरवर आले आहे. तर याच दरम्यान आयातीतही १५.२८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

आयातीमध्ये झालेल्या या घटीमुळे देशातील आयात आता ३७९.५ कोटी डॉलरवर आली आहे. तर दुसरीकडे मार्च महिन्यात निर्यातीत ५.४७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात निर्यात २२.७१ अब्ज डॉलर राहिली. निर्यातीत झालेली ही घसरण सलग १६ व्या महिन्यात नोंदवण्यात आली आहे. तर या महिन्यात आयातदेखील २१.५६ टक्क्यांनी कमी होऊन २७.७८ कोटी डॉलर झाली आहे.