आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feb IIP At Three month High Of 5%, Beats Estimates

औद्योगिक उत्पादनवाढीचा नऊ महिन्यांचा उच्चांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादनाचे निदर्शक असणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) फेब्रुवारीत ५ टक्क्यांनी वधारला आहे. खाण आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे तसेच त्याला भांडवली वस्तूंच्या उत्पादनाची जोड लाभल्याने या निर्देशांकाने ही वाढ नोंदवली आहे.

वार्षिक तुलनेत फेब्रुवारी २०१४ मध्ये हा निर्देशांक २ टक्क्यांनी घटला होता. एप्रिल ते फेब्रुवारी २०१४-१५ या काळात आयआयपी २.८ टक्क्यांनी वाढला आहे. वार्षिक तुलनेत मागील वर्षी याच काळात आयआयपी नकारात्मक पातळीत होता. केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. आयआयपीमध्ये ७५ टक्के वाटा असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने फेब्रुवारीत ५.२ टक्के वाढ नोंदवली आहे.