आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी २,१०० उत्पादनांच्या निर्यातीवर आर्थिक प्रोत्साहन : वाणिज्य मंत्रालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुमारे दीड वर्षापासून नकारात्मक झोनमध्ये असलेल्या देशातील निर्यातीला चालना देण्यासाठी समुद्रातील उत्पादनासह विविध प्रकारच्या वस्तूंवर आर्थिक प्रोत्साहन देण्याची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. भारतीय निर्यातदार मदत योजनेअंतर्गत (मर्चेंडाइझ एक्स्पोर्टर्स फ्रॉम इंडिया स्कीम - एमईआयएस) सरकारकडून मिळणाऱ्या एकूण सहयोगामध्ये सध्याच्या २२,००० कोटी रुपयांमध्ये वाढ करण्यात आली असून ते २३,५०० कोटी रुपये करण्यात आले आहेत. या योजनेला नवीन विदेशी व्यापार धोरणाअंतर्गत (२०१५-२०) लागू करण्यात आले आहे. यामध्ये “ड्यूटी क्रेडिट स्क्रिप’ मिळते, त्याचा वापर आयात शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर भरण्यासाठी करता येतो.

जागतिक पातळीवर भारतीय निर्यातकांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्यासमोरील आव्हाने पाहता काही नव्या उत्पादनांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त विविध श्रेणींमध्ये असलेल्या २,०९१ आणखी उत्पादनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. एमईआयएसअंतर्गत इतरही काही उत्पादनांवर देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

यांचा समावेश
यामध्ये पारंपरिक औषधांचा जसे की अश्वगंधा, काही समुद्री उत्पादने, समुद्री फीड, वाळलेला कांदा, अभियांत्रिकी वस्तू, कपडे, कापड, केमिकल्स, सिरॅमिक, काचेच्या वस्तू, वृत्तपत्र, नियतकालिके, सिल्कच्या वस्तू, पाइप्स यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...