आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flipkart Will Shut Down Website And Operate On App

Flipkart वेबसाईट सप्टेंबरपासून होणार बंद, App वर चालणार कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक)- Myntra वेबसाईट बंद करुन केवळ अॅपवर कारभार चालणार असल्याचे कंपनीने जाहीर केल्यावर ऑनलाईन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. पण या निर्णयाला दोन महिने लोटत नाहीत तोच पॅरेंट कंपनी आणि भारताची सर्वांत मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी Flipkart हीही वेबसाईट बंद करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून वेबसाईटचा कारभार बंद होणार असून केवळ अॅपवर व्यवसाय केला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे.
Flipkart कंपनीचे चिफ प्रोडक्ट ऑफिसर पुनित सोनी यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या टाऊन हॉल मिटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले, की येत्या सप्टेंबर महिन्यापासून वेबसाईट बंद केली जाणार आहे. त्यानंतर केवळ अॅपवर आपला कारभार चालणार आहे.
सध्या भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन्सची प्रचंड विक्री होत असून मोबाईल इंटरनेटचे युजर्स दिवसेंदिवस मोठ्या गतीने वाढत आहेत. त्यामुळे Flipkart ने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. भारतीय ऑनलाईन बाजारपेठेत काळानुरुप होत असलेले बदल या निमित्ताने अधोरेखित होत आहेत.
अॅपमुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव आणखी खासगी पातळीवर नेता येतो. ग्राहकांच्या ठिकाणाची माहिती, आवडी-निवडी, खरेदीचा पॅटर्न आदी गोष्टी माहित करुन घेणे वेबसाईटच्या माध्यमातून शक्य होत नाहीत.
सध्या Flipkart च्या एकूण उलाढालीपैकी 70%-75% व्यवसाय अॅपच्या माध्यमातून येतो. त्यामुळे भविष्यात या कंपनीचा अॅपवर जास्त भर राहण्याची दाट शक्यता होती. शिवाय वेबसाईट ही केवळ कॅटलॉग वेबसाईट असेल असे सांगितले जात आहे.