आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर गरिबांच्या जेवणावर आणि BMW कारवर सारखाच टॅक्स लागला असता: अरुण जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरुण जेटली यांनी रविवारी म्हटले की, काही लोकांनी सल्ला दिला होता की सर्व वस्तूंवर एकसमान दराने जीएसटी लावला पाहिजे. असा सल्ला देणाऱ्या लोकांना आर्थिक असमानता नेमकी कळलेली नाही. जर असे झाले असते, तर गरिबांचे जेवण आणि बीएमडब्ल्यू कार, दोन्हींवर 15 ते 16 टक्के जीएसटी लागला असता. रायपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अरुण जेटली यांनी हे विधान केले.
 
मोदींनी एक कर दिला...
- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रायपूरमध्ये असेही म्हटले की, पूर्ण विश्वात अप्रत्यक्ष कराला अविकसितपणाचे लक्षण मानले जाते.
यूपीए सरकारला निर्णय घेता येत नव्हता...
जेटली म्हणाले की, यूपीए शासनाला जीएसटी विधेयकाबाबत निर्णय घेता आला नाही, त्यामुळेच हे विधेयक तेव्हा मंजूर झाले नाही. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातील 550 संस्थानांना विलीन करून एक केले होते, त्याचप्रमाणे मोदींनी 29 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक रूपाने एक केले आहे.
बातम्या आणखी आहेत...