आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Stopping Inflation States Increase Supply, Paswan Give Order

महागाई थांबवण्यासाठी राज्यांनी पुरवठा वाढवावा, पासवान यांचे राज्यांना निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रामविलास पासवान यांचे स्वागत करताना ग्राहक व्यवहार सचिव सी. विश्वनाथ.
नवी दिल्ली - महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यांनी पुरवठा वाढवून नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी दिल्या आहेत. नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या अन्न व पुरवठामंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या मते डाळी तसेच इतर अन्नधान्याचे भाव साठेबाजीमुळे वाढत आहेत, अशी साठेबाजी थांबवण्यासाठी राज्यांनी भांडाराची क्षमता वाढवण्याचा सल्ला या वेळी देण्यात आला. यासाठी औद्योगिक क्षेत्राची मदत घेण्यात यावी, असेही या वेळी पासवान यांनी सांगितले. डाळी व कांदा सोडला, तर इतर अन्नधान्याचे भाव वाढले नसल्याचेही ते म्हणाले.

अन्न सुरक्षा विधेयक : अन्न सुरक्षा विधेयकाला दोन वर्षे पूर्ण झाली असले तरी आतापर्यंत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तो लागू करण्यात आलेला नाही. जर या राज्यांनी सप्टेंबरपर्यंत कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर त्यांचा अतिरिक्त अन्नधान्य पुरवठा बंद करणार असल्याचेही पासवान यांनी सांगितले. आतापर्यंत १२ राज्यांनी हा कायदा अमलात आणला आहे. यात एमपी, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थानचा समावेश आहे, तर दिल्ली, चंदिगड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अंशत: लागू करण्यात आला आहे.

पाच हजार टन उडीद डाळीची अायात
डाळींची बाजारातील उपलब्धता अाणि त्यांच्या वाढत्या किमती सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत अाहे. त्यावर उपाय म्हणून पाच हजार टन उडीद डाळीची अायात करण्याचा केंद्र सरकार विचार करीत अाहे. मागील वर्षात प्रतिकूल हवामानामुळे जून ते जुलै पीक वर्षात देशातील डाळींचे उत्पादन जवळपास दाेन दशलक्ष टनांनी घटले अाहे. त्यामुळे डाळींच्या तुटवड्यामुळे ब-याचशा भागात अपुरा पुरवठा हाेत अाहे. परिणामी देशाच्या ब-याचशा भागात तूर डाळीसह बहुतांश डाळींच्या किरकाेळ किमती किलाेमागे १०० रुपयांपर्यंत पाेहोचल्या अाहेत. साधारणपणे जूननंतर काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झालेली दिसते. डाळींच्या किमतीत अगाेदरच वाढ झाली अाहे. त्यासाठीच उडीद डाळीची अायात करण्याचा विचार असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव सी. विश्वनाथ यांनी सांगितले.