आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गहू महागला, देशात गव्हाची आयात कमी होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात यावर्षी गव्हाची आयात होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे भाव वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तर सरकार गव्हावर १० टक्के आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या वर्षी देशात जास्त गव्हाची आवक होण्याची शक्यता कमीच असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे जास्त प्रोटीन असलेल्या गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात गव्हाच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे देशातील बाजारात गहू उपलब्ध असूनदेखील चांगल्या प्रतीच्या गव्हाची कमतरता आहे. त्यामुळे खासगी फ्लोअर मिल व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावरून पाच लाख टन गव्हाची आयात करणार आहे. तसेच फ्रान्स आणि रशियावरूनदेखील पाच लाख टन गव्हाची आयात करण्याची योजना आहे.
रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष एम. के. दत्त राज यांनी सांगितले की, उच्च दर्जाचा गहू मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात पिकवला जातो. मात्र, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे गव्हाची गुणवत्ता कमी झाली आहे. सरकार गव्हावर १० टक्के आयात शुल्क वाढवण्याच्या तयारी असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे आयात वाढण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत दुसरा मोठा उत्पादक देश
जगातगहू दुसरा मोठा उत्पादक देश आहे.२०१४-१५ मध्ये देशात गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. या दरम्यान ९०७.८ लाख टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात ९५८.५ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले होते. सरकारी गोदामांमध्ये कमी गुणवत्तेच्या गव्हाचा मोठा साठा शिल्लक आहे. हा साठा संपवण्यासाठी गव्हाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे.
बातम्या आणखी आहेत...