आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सीएफओ बन्सल यांचे पॅकेज कमी हवे होते, इन्फोसिसचे अध्यक्ष शेषशायी यांनी कबूल केली चूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इन्फोसिसचे माजी मुख्य वित्त अधिकारी राजीव बन्सल यांना कंपनी सोडताना दोन वर्षांच्या वेतनाबरोबर ‘सेवरेंज पॅकेज’ देणे ही संचालक मंडळाची चूक होती, असे इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष आर. शेषशायी यांनी म्हटले. संचालक मंडळाच्या व्यावसायिक न्यायनिवाड्याचा हा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. इन्फोसिस व्यवस्थापनाने सोमवारी कंपनी प्रवर्तकाच्यां प्रश्नांची उत्तरे दिली. 

कंपनीतील माहिती दडवून ठेवण्यासाठी बन्सल यांना काही मोबदला देण्यात आला नसल्याचे शेषशायी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, बन्सल प्रकरणानंतर सल्लागारांच्या मदतीने जगातील इतर कंपन्यांतील सेवरेंज पॅकेजचे पुनरावलोकन करण्यात आले. यानंतर एप्रिल २०१६ पासून करार करून ही अट काढण्याचा निर्णय झाला. करारातंर्गतच बन्सल यांना १७.३० कोटी रुपये म्हणजेच दोन महिन्यांचे वेतन देण्यास मान्यता दिली गेली. परंतु प्रत्यक्षात केवळ पाच कोटी देण्यात आले. 
 
नारायण मूर्तींसह तीन प्रवर्तकांनी बन्सल यांना दिलेल्या सेवरेंज पॅकेजवर प्रश्न उपस्थित केला. अशा प्रकारचे पॅकेज माजी सीएफओ व्ही. बालाकृष्णन आणि मोहनदास पै यांना का नाही दिले? अशी विचारणा त्यांनी केली. बन्सल प्रकरणाला न्यूजर्सी येथील कंपनी पनायाच्या अधिग्रहणाशी जोडले जात आहे. इन्फोसिसने फेब्रुवारी २०१५ मध्ये या कंपनीला २० कोटी डॉलरमध्ये खरेदी केले होते. बन्सलने या दरावर खंत व्यक्त करत आॅक्टोबर २०१५ मध्ये कंपनी सोडली होती. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये काही वाद नाहीत. कंपनीचे सीईओ विशाल सिक्कांच्या पॅकेजवर प्रशासनाचा काही मुद्दा नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जानेवारी २०१७ पासून सिक्का यांना वार्षिक १.१ कोटी डॉलर पॅकेज दिले जात आहे. 
 
चार्टर्ड विमानाचे भाडे सिक्कांनी दिले
सिक्कांच्या चार्टर्ड विमानाने प्रवास करण्यासंबंधी अध्यक्षांनी म्हणणे मांडले. ते म्हणाले, सीईओंनी दोन महिन्यात ६० हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. यात फक्त ८ टक्के चार्टर्ड विमानाने प्रवास करण्यात आला. याचा खर्च सिक्का यांनी केला. डीन प्रल्हाद आणि पुनिता सिन्हा यांना स्वतंत्र संचालक बनवण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला.
 
सात हजार जणांनी नोकरी सोडली
तेलंगणा सरकारच्या आयटी विभागाचे सचिव जयेश रंजन म्हणाले, ३३ वर्षात पहिल्यांदाच कंपनीत नोकरी देणाऱ्यांची संख्या घटली. दरवर्षी २० ते २५ हजार लोकांना नोकरी मिळत होती. यावर्षी फक्त ६ हजार लोकांना नोकरी मिळाली. तर ७ हजार लोकांनी नोकरी सोडली. 
 
अतिशय चांगल्या लोकांकडूनही चुका
याआधी नारायण मूर्ती म्हणाले होते की, प्रशासनाच्या मुद्द्यावर संचालक मंडळाने उत्तर द्यायला हवे. संचालक मंडळातील सदस्य निष्ठावंत आहेत. परंतु चांगल्या लोकांकडूनही चुका होत असतात. चांगल्या नेतृत्वाने सर्व बाजू समजून पावले उचलणे आवश्यक आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...