आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॉक्सकॉन’ राज्यात गुंतवणार ३२ हजार कोटी; सात भेटींनंतर घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फॉक्सकॉन या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष चेरी गोऊ यांनी मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फॉक्सकॉन या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष चेरी गोऊ यांनी मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मुंबई- इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेली चीनमधील फॉक्सकॉ टेक्नॉलाजी कंपनी महाराष्ट्रात ५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३२ हजार कटींची गुंतवणूक करणार आहे. राज्य सरकारबरोबर कंपनीने शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

पाच वर्षांत होणाऱ्या या गुंतवणुकीतून फॉक्सकॉन राज्यात निर्मिती, संशोधन व विकास प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे स्टेटस सिंबॉल असलेल्या अॅपलच्या आयफॉनचे उत्पादन राज्यात हाेण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीमुळे ५० हजार रॉजगाराच्या संधी निर्माण होतील. इलेक्ट्रॉनिक्स कम्पोनंट निर्मीती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून फॉक्सकॉनची ओळख आहे. फॉक्सकॉन समूहाचे संस्थापक अध्यक्ष टेरी गाऊ म्हणाले, या गुंतवणुकीसाठी मी दोन महिने महाराष्ट्रात येत होतो. माझी ७० जणांची टीम कार्यरत होती. सात वेळा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. त्यातून महाराष्ट्रच या गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याचे पटले आणि शनिवारी पहाटे तीन वाजता हा करार करण्याचा निर्णय घेतला. फॉक्सकॉन आणि राज्य सरकार यांच्यात शनिवारी करारावर स्वाक्षऱ्या
झाल्या.

कंपनीचे अध्यक्ष टेरी गो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्ष ऱ्या केल्या. उद्योग मंत्री सुभाष देसाई देखील यावेळी उपस्थित होते. आगामी काळात देशाच्या विविध राज्यात उत्पादन विभाग सुरू करण्याचा फॉक्सकॉनचा विचार आहे. स्मार्टफोन बाजारपेठेची झपाट्याने वाढ होत असलेल्या भारताबरोबर भागीदारी होऊ शकते असे गोऊ यांनी मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले होते.

कर वादातून नोकियाचा प्रकल्प बंद :
अॅपल आयफोनची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉनने कराच्या वादातून तामिळनाडूचा प्रकल्प बंद केला होता. तामिळनाडूतून बाहेर पडल्यानंतर फॉक्सकॉनची ही देशातील पहिलीच गुंतवणूक आहे.

फॉक्सकॉनची खासगी कंपन्याशी चर्चा :
फॉक्सकॉन भारतात सहयोगी कंपन्यां स्थापन करण्यास इच्छुक असल्याचे गोऊ यांनी सांगितले. यासाठी स्नॅपडील, मायक्रोमॅक्स, ग्रीनडस्ट व अदानी समूहाशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील गुंतणुकीसाठी टाटा सन्स, टीसीएस, भारत फोर्ज, शेपूरजी पॅलोनजी यांच्यात फॉक्सकॉनने रस दाखवला आहे. या संदर्भात गोऊ यांनी नुकतीच मुंबई-आयआयटीला भेट दिली.
मेक इन इंडियातील पहिली मोठी गुंतवणूक
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर करण्यात आलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी अभियानातील देशात होणारी फॉक्सकॉनची ही सर्वात मोठी पहिली गुंतवणूक आहे. पाच अब्ज डॉलरच्या या गुंतवणुकीमुळे इतर कंपन्याही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

चीन दौऱ्याचे फलित
दोन महिन्यांपूर्वी आपण चीन दौऱ्यावर गेलेलो असताना फॉक्सकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती. फोक्सकोनच्या या नव्या प्रवासामध्ये राज्य सरकार नेहमीच त्यांच्यासोबत राहील. राज्यात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

फॉक्सकॉन : जगातील अव्वल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जगातील अव्वल कंपन्यांत फॉक्सकॉनची गणना होते. चीनमध्ये १९७४ मध्ये टेरी गाऊ यांनी होन हाय फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीची स्थापना केली. या क्षेत्रातील नॅनो मेजर, वायरलेस नेटवर्क, कॅड, सीएईसह कपनीकडे ५५ हजार पेटंट आहेत. चीनमधील ही सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे. फोर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांत फॉक्सकॉन ३२ व्या स्थानी आहे. कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देण्याबाबत फॉक्सकॉन नेहमीच चर्चेत राहिली आहे.

प्रस्ताव असा
गुंतवणूक- 05 अब्ज डॉलर
प्रत्यक्ष रोजगार- 50 हजार
प्रकल्प- 02 किंवा तीन
लागणारी जागा- 1500 एकर
ठिकाण- संभाव्य प्रकल्प : सोलार डेटा सर्व्हर स्टोरेज उभारणी, मोबाइल, टॅब्लेट, टीव्ही,
मोबाइल हरित तंत्र संशोधन.

- निर्मिती प्रकल्प : तळेगाव, जि.पुणे
: ९०० एकर
- संशोधन व विकास प्रकल्प : खालापूर (पेण -खोपोली रस्त्यावर)
येथे आर अँड डी प्रकल्प, कर्मचारी निवासस्थाने, शाळा-महाविद्यालये व
इतर सुविधा असतील.