आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपी ७.४ टक्के राहण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारच्या वतीने पुढील काही महिन्यांत टॅक्सेशन, मंजुरी आणि नोंदणीसह अनेक बाबतीत मोठा दिलासा देण्यात येणार आहे. पुढील अर्थसंकल्पात विदेशी गुंतवणुकीसाठी करांसंबंधी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एफपीआय आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) आणि आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांच्यामध्ये शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये याविषयीचे संकेत मिळाले आहेत.

गुंतवणूकदारांसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी बैठकीनंतर दिली. गुंतवणूकदारांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना पुढील अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात २०१५-१६ मध्ये जीडीपी विकास दर ७.४ टक्के राहण्याची शक्यता असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत महत्त्वाचे मुद्दे : विदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक व्यवहार सचिवांशी केलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गुंतवणूकदारांनी टॅक्सेशन, मंजुरी आणि नोंदणीसह अनेक बाबतीत पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला. याविषयी गुंतवणूकदारांच्या सूचना लवकरच सरकारसमोर ठेवणार असल्याचे दास यांनी सांगितले.