आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या नाणे ट्रेडिंगसाठी पर्याय, नाणे खरेदी-विक्री वाढण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्स पुढील सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांचे ट्रेडिंग करण्यासाठी नवा पर्याय तयार करत आहे. त्यामुळे सोन्याचे नाणे खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारात आता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयामुळे ज्या लोकांनी आधीच बँकेकडून सोन्याचे नाणे खरेदी केले आहेत, तेदेखील आता बाजारभावाने त्यांची विक्री करू शकतील. देशात सोन्याच्या नाण्यांची वार्षिक उलाढाल २५,००० कोटी रुपयांची आहे.

सोनाराकडे विकल्यास होत होते नुकसान : याआधी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे नाणे कोणत्याही सोनाराकडे विक्रीसाठी नेले तर सोनार त्यात ३-४ टक्के कपात करून पैसे देत होता, तर २२ कॅरेट सोन्याच्या विक्रीमध्ये ६ ते ८ टक्के कमी किंमत मिळत असल्याने नुकसान सहन करावे लागत होते.

घरातील सोने बाहेर निघेल
एनसीडीईक्सने सोन्याची खरेदी आणि विक्री करण्यासाठी पारदर्शी आणि सोयीस्कर ऑनलाइन बाजार "गोल्ड नाऊ'ची सुरुवात केली आहे. त्यासाठी अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोची, हैदराबाद आणि चेन्नई येथे केंद्र बनवण्यात येतील. एक्स्चेंजला विश्वास आहे की, यामुळे घरी किंवा लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास २५,००० टन सोन्यातील २ ते ५ टक्के सोने बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे.