आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने झाले स्वस्त, पाच वर्षांमध्‍ये पहिल्यांदाच घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्याचे भाव पाच वर्षांच्या तुलनेत खाली घसरले आहेत. कॉमेक्सवर सोनं 12 डॉलरच्या घसरणीसह 1 हजार 132 डॉलर प्रति ग्रॅमवर बंद झाले. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची किंमत 25 हजार 500 प्रति 10 ग्रॅमने खाली आले आहेत. या वर्षी अमेरिकेत व्याज दर वाढण्‍याची शक्यता आणि डॉलरची घोडदौडीमुळे सोन्याची किंमती घसरल्या आहेत.तसेच चीनने मागील वर्षाच्या तुलनेत कमी सोनं खरेदी केले आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील तीन महिन्यांमध्‍ये 24 हजार पर्यंत सोन्याचे दर येतील. शुक्रवारी आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन 1 हजार 113. 70 डॉलर प्रति ग्रॅमने घसरला होता.
सोन्याच्या दरात आणखी घसरण शक्य
केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांनी सांगितले, की अमेरिकेत या वर्षी दोन वेळेस व्याज दर वाढले आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाब येऊन त्यात वाढ होऊ शकते. दुसरीकडे चीन आणि भारतातून सोन्याची मागणी कमी आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या चीनमध्‍ये सोन्याची मागणी कमी होत चालली..