आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Prices Witness Steep Falln Upon Weak Global Ques And Weak Domestic Demand

जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेतामुळे सोने गडगडले, रुपया घसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, नवी दिल्ली- जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि देशातील ज्वेलर्स व रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा फटका बुधवारी मौल्यवान धातूंना बसला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ५१० रुपयांनी गडगडून २७,१९० वर आले. ही यंदाची सर्वात मोठी घसरण मानली जाते. चांदी किलोमागे १७०० रुपयांनी घसरून ३७,२०० झाली. औद्योगिक क्षेत्रातून मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला. दरम्यान, विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १८ पैशांनी घटून ६२.३४ वर आले. बँका आणि आयातदारांकडून डॉलरला मागणी आल्याने रुपया घसरला.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, ज्वेलर्सकडून मागणीच नसल्याचा फटका सोन्याच्या किमतीला बसला. त्यामुळे सोने घसरून सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आली. जागतिक सराफा बाजारातही वेगळे चित्र नव्हते. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.३ टक्क्यांनी घसरून १,२०६.४८ डॉलरवर आले. ग्रीस युरोझाेनमधून बाहेर पडण्याची शक्यता कमी झाल्याचा परिणामही सोन्याच्या किमतीवर झाला. जगभरात शेअर बाजारांत आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा तिकडे वळवल्याचाही परिणाम सराफा बाजारावर झाला.

रुपयाची आपटी
विदेशी मुद्रा विनिमय बाजारात मागील दोन सत्रांत डॉलरवर कुरघोडी करणारा रुपया बुधवारी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १८ पैशांनी घटून ६२.३४ वर आले. फॉरेक्स डीलर्सनी सांगितले, बँका आणि आयातदारांकडून डॉलरला मागणी आल्याने रुपया घसरला.