आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन नाेकऱ्यांसाठी अच्छे दिन, बंगळुरू अाघाडीवर; पुणे, मुंबईतही कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञान, बँक, अाैषध क्षेत्रांमध्ये चांगली वाढ झाल्यामुळे जुलै महिन्यात नवीन नाेकर भरतीमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अन्य क्षेत्रांतही हा कल वाढण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात अाला अाहे.

गेल्या वर्षाच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात नवीन नाेकर भरतीत ११ टक्क्यांनी वाढ झाली. या अार्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नाेकरी बाजाराचा चढता क्रम कायम राहिल्यामुळे नाेकरी डॉट काॅमच्या नाेकरी निर्देशांकात वाढ झाली अाहे. गेल्या काही महिन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, बँक अाणि औषध या क्षेत्रांमध्ये चांगली वाढ झाली असून पुढील सहा महिन्यांत अन्य उद्याेग क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती हाेईल, असे मत कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष अाणि विक्रीप्रमुख व्ही. सुरेश यांनी व्यक्त केले. यात बंगळुरू अाघाडीवर असून त्यापाठाेपाठ पुणे अाणि मुंबईतही कल वाढला अाहे.
झालेली वार्षिक वाढ
अायटी साॅफ्टवेअर २६ %
अायटी हार्डवेअर २१ %
मीडिया, एंटरटेनमेंट १९ %
अाैषध १६ %
अाराेग्य १५ %