आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांच्या स्थितीत सुधारणा, सरकारच्या प्रयत्नांना यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - साखर कारखान्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. २०१४-१५ मध्ये कारखान्याकडे ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे २१,००० कोटी रुपये बाकी होते, त्यात आता घट झाली असून कारखान्यांकडे सध्या फक्त २,७०० कोटी रुपयेच बाकी आहेत. तसे पाहिले तर हा आकडा गेल्या वर्षीच्या एऱ्यर्सपेक्षाही कमी आहे.

देशात मागणीपेक्षा उत्पादन जास्त झाल्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले होते. गेल्या वर्षी साखरेच्या किमती कमी झाल्यामुळे कारखानदारांचे मोठे नुकसान झाले. १५ एप्रिल २०१५ रोजी साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २१,००० कोटी रुपये बाकी होते. त्यानंतर ही स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. निर्यातीवर या कारखानदारांना इन्सेंटिव्ह देण्यात आला, तसेच स्वस्तात कर्ज, इथेनॉलवर एक्साइज ड्यूटी काढण्यात आली. या सर्वांमुळे या कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे फेडले.

सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या "इथेनाॅल ब्लेंडिंग प्रोग्राम'मुळेदेखील या कारखान्यांना मदत मिळाली. सध्याच्या स्थितीत साखर कारखान्यातून आॅइल कंपन्यांना ६.८२ कोटी लिटर इथेनॉल पुरवले जाते.
बातम्या आणखी आहेत...