आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government To Create 40K Tons Of Buffer Stock Of Pulses To Check Prices

सरकार खरेदी करणार 40 हजार टन डाळ : संजीवकुमार बालियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळींचा जास्तीचा साठा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांकडून ४०,००० टन डाळींची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी दिली. यामध्ये शेतकऱ्यांकडून ३०,००० टन तूर डाळ, तर १०,००० टन उडीद डाळ खरेदी करण्यात येणार आहे.
देशातील विविध भागांत सध्या डाळींची किरकोळ किंमत १९० रुपये किलाेपर्यंत गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिल्लीमध्ये केंद्रीय भंडार आणि मदर डेअरीच्या "सफल' दुकानांमध्ये आयात केलेली तूर डाळ १२० ते १३० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.
अांध्र प्रदेश आणि तामिळनाडू सरकारच्या वतीनेदेखील आयात डाळींची विक्री सुरू करण्यात आली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डाळींचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयात करण्यात आलेल्या
कडधान्याचा प्रस्तावदेखील देण्यात आला आहे. "मूल्य स्थिरीकरण
निधी' (पीएसएफ)चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कांद्याची निविदा काढली
देशातील बाजारात १,००० टन आयात केलेला कांदा विकण्यासाठी सरकारी संस्था एमएमटीसीने देशातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. याबाबत जाहीर करण्यात आलेल्या निविदेनुसार एमएमटीसी चीन आणि इजिप्तमधून आयात करण्यात आलेला ५०० - ५०० टन कांदा विकणार आहे. याबाबतची बोली २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टाेबरदरम्यान लावता येणार आहे. यातील कांदा हा निविदाकर्त्याला मुंबईमधून दिला जाणार आहे. बाजारात आवक कमी झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांदा ८० रुपये किलोवर गेला होता. यादरम्यान कांद्याची निर्यात बंद करण्यात आल्यानंतर कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलोवर आला होता. किरकोळ बाजारात आयात करण्यात आलेला कांदा पोहोचल्यामुळे कांद्याचे भाव आणखी कमी झाले आहेत.

नियोजन आवश्यक : नीती आयोग
कांद्याच्या विक्रीबाबत योग्य नियोजन केल्यास कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवणे सोपे असल्याचे मत नीती आयोगाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आयोगाच्या वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये कांद्याचा साठा करण्यासाठी वापरण्यात येणारे गोदाम चांगले असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रमेश चंद यांच्या मते, उत्पादनात वाढ होत असली, तरी गेल्या तीन वर्षांपासून कांद्याच्या किमती वाढत आहेत. २००२ -०३ मध्ये देशात ५५ लाख टन कांद्याचे उत्पादन झाले होते. ते वाढून सध्या १.९ कोटी टनांवर गेले आहे. प्रति व्यक्ती चार किलो कांदा २००२-०३ मध्ये उपलब्ध होता.