आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगार हाेणार ‘स्मार्ट’, सामाजिक सुरक्षेचे कामगारांना मिळावे म्हणून पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विविध प्रकारचे सामाजिक सुरक्षेचे लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून असंघटित क्षेत्रातील कामगारांना लवकरच स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याचे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या या याेजनेचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते या महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या अाठवड्यात अनावरण करण्यात येणार अाहे.

देशातील ४५ काेटी कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सामाजिक सुरक्षिततेचे काेणतेही लाभ मिळत नाहीत. अशा कामगारांना हे लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘यू-विन’ (अनअाॅर्गनाइज्ड वर्कर अायडेंटिफिकेशन नंबर) कार्ड देण्यात येणार येणार असून या उपक्रमासाठी एक वेबसाइटदेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न
बांधकाम कामगार, विडी कामगार, अंगणवाडी कामगारांना सामाजिक सुरक्षिततेचे लाभ मिळणे गरजेचे अाहे. अाराेग्य सुविधा, घर, पेन्शन यांसारख्या सुविधादेखील त्यांना उपलब्ध होत नाहीत, परंतु अाता या कामगारांना कार्ड देण्याबराेबरच राष्ट्रीय स्वास्थ्य विमा याेजना, अाम अादमी विमा याेजना, वयस्कर पेन्शनसारख्या सुविधा देण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अायाेजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

स्थलांतर केले, तरीही सामाजिक सुरक्षिततेसाठी पंतप्रधान जनसुरक्षा याेजना, जीवन ज्याेती विमा याेजना, अटल पेन्शन याेजना सुरू केल्या असून त्यामध्येदेखील या कामगारांना समाविष्ट केले जाईल. विशेष म्हणजे हे कामगार एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाले, तरीही त्यांना या कार्डाचा लाभ मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...