आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकहिताचा निर्णय; 2018 पासून ऑनलाइन वस्तूंवर MRPसह सर्व माहितीची बोल्ड अक्षरांत प्रिंटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपन्यांसाठी जानेवारी  2018 पासून एमआरपीसह इतर माहिती प्रिंट करणे बंधनकारक असेल. ऑनलाइन ग्राहकांच्या हितासाठी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तूंवर एमआरपी प्रिंट करण्यासह एक्स्पायरी डेट तसेच कस्टमर केअर डिटेल्सची माहिती देणेही गरजेचे केले आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने मागच्या महिन्यात लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रुल्स 2011 मध्ये संशोधन केले आहे. कंपन्यांनी नव्या नियमाच्या अनुपालनासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 
 
सध्या फक्त एमआरपीच प्रिंट होतेय...
- ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही रूपांमध्ये संरक्षण मिळाले पाहिजे. सध्या ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर फक्त एमआरपी (मॅक्सिमम रिटेल प्राइस) प्रिंट होतेय. आम्ही कंपन्यांना इतर माहितीही छापण्याचे सांगितले आहे.
 
बोल्ड अक्षरांत करावे लागेल प्रिंट
- ग्राहक संरक्षण मंत्रालयानुसार, ग्राहकांना सहजतेने वाचता येण्यासाठी कंपन्यांना प्रॉडक्टचे डिटेल मोठ्या फाँट साइजमध्ये द्यावे लागेल.
- मंत्रालयाने ग्राहकांकडून मिळालेल्या शेकडो तक्रारींनंतर ई-मार्केटप्लेस करिता हा बदल केला आहे. 
- देशात ऑनलाइन मार्केटमध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडिया, स्नॅपडील, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसारख्या काही मोठ्या कंपन्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...