आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेन्शन’मधील ‘एफडीअाय’ मर्यादेत वाढ, २६ वरून ४९ टक्के गुंतवणूक मुभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विमा क्षेत्रापाठाेपाठ अाता केंद्र सरकारने पेन्शन क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा िनर्णय घेतला अाहे. याबाबतचे प्रसिद्धिपत्रक अाैद्याेगिक धाेरण अाणि प्राेत्साहन परिषदेने साेमवारी प्रसिद्ध केले अाहे.
विमा िनयामक अाणि विकास प्राधिकरण २०१३ कायद्यांतर्गत केंद्र सरकारने पेन्शन क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणूक मर्यादा वाढवण्याचा िनर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले अाहे. अाैद्याेगिक अाणि प्राेत्साहन खात्याचे प्रसिद्धिपत्रक हे अधिकृत दस्तएेवज असून त्यामार्फत नवीन एफडीअाय धाेरण िकंवा विद्यमान कायद्यातील बदलाची अंमलबजावणी करण्यात येणार अाहे.
विदेशी राेखासंग्रह गुंतवणूकदार, विदेशी गुंतवणूकदार संस्था, अनिवासी भारतीय गुंतवणूकदार अादी विविध स्वरूपातील पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात अाली अाहे. २६ टक्क्यांपर्यंतच्या िवदेशी थेट गुंतवणुकीसाठी सरकारची मान्यता घेण्याची गरज नाही, परंतु २६ टक्क्यांच्या पुढे अाणि ४९ टक्क्यांपर्यंतच्या एफडीअायसाठी मात्र विदेशी गुंतवणूक प्राेत्साहन मंडळाची परवानगी घेणे गरजेचे असेल.