आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपतींपेक्षा 1 लाख जास्त सॅलरी मिळते या सरकारी बाबुंना, 9 वर्षांपासून आहे हा फरक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- ही माहिती वाचायला निश्चितच विचित्र वाटेल, पण देशाच्या राष्ट्रपतींपेक्षा केंद्रातील सर्वांत वरिष्ठ सरकारी बाबूला १ लाख रुपये जास्त पगार मिळतो. उपराष्ट्रपती आणि राज्यांच्या राज्यपालांना तर या अधिकाऱ्यापेक्षा दुपटी, तिपटीने कमी पगार मिळतो. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशातील सर्वांत मोठा अधिकारी म्हणजेच कॅबिनेट सेक्रेटरीला 2.5 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो. दुसरीकडे, देशाच्या राष्ट्रपतीला केवळ १.५ लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो. ही विषमता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्यास सुरवात केली आहे. पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही.

 

गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांची सॅलरी वाढविण्याचे प्रपोजल गृहमंत्रालयाने तयार केले आहे. तसेच कॅबिनेट सेक्रेटरीएट पाठविण्यात आले आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी हे प्रपोजल पाठविण्यात आले होते. पण कॅबिनेट सेक्रेटरीने अद्याप याला मंजुरी दिलेेली नाही. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

 

सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीची किती आहे सॅलरी
सध्या राष्ट्रपतींना प्रति महिना १.५ लाख रुपये पगार दिला जातो. उपराष्ट्रपतींना १.२५ लाख तर राज्यपालांना १.१० लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो. या व्यतिरिक्त इतर सुविधाही त्यांना दिल्या जातात.

 

पुढील स्लाईडवर वाचा... कॅबिनेट सेक्रेटरी,सेक्रेटरी यांचा पगार... लष्कर प्रमुखांपेक्षाही राष्ट्रपतींचा पगार कमी... मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपतींना किती पगार मिळेल... ९ वर्षांपूर्वी वाढली होती राष्ट्रपतींची सॅलरी...

बातम्या आणखी आहेत...