आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी झुकले ग्रीस, सुरक्षेच्या बजेटमध्येदेखील कपात मान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्रीसने युरोझोनला बेलआऊट पॅकेजसाठी नवा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये व्यावसायिक कर २६ टक्क्यांवरून २८ टक्के करण्याचा समावेश आहे. तसेच २०१६ च्या शेवटपर्यंत व्हॅटमधून सूट बंद करण्याची योजना आखण्यात आली आहे. याव्यतिरिक्त लवकर निवृत्ती घेण्याची योजना बंद करणे, सुरक्षेच्या बजेटमध्ये ३० कोटी युरोची कपात करणे या अटींचा समावेश करण्यात आला आहे.

असे असले तरी जर्मनीसहित युरोझोनमधील इतर देशांना ग्रीसच्या प्रस्तावावर विश्वास नाही. प्रस्तावात दिलेल्या अटी ग्रीस पूर्ण करेल असे इतर देशांना वाटत नाही. नागरिकांनी केलेल्या नकारात्मक मतदानामुळे इतर देशांची शंका आणखीनच वाढली आहे. शनिवारी युरोझाेनचे अर्थमंत्री ग्रीसच्या प्रस्तावावर अभ्यास करतील. तसेच रविवारी होणा-या युराेपीय संघाच्या संमेलनात यावर चर्चा होणार आहे. ग्रीसचे पंतप्रधान तिस्प्रास यांनीदेखील शुक्रवारचा पूर्ण दिवस आपल्या मंत्रिमंडळासोबत या प्रस्तावावर चर्चा केली.

ग्रीसचा प्रस्ताव असा
>व्यावसायिक कर २६ टक्क्यांवरून २८ टक्के
>२०१६ च्या शेवटपर्यंत व्हॅटमधून सूट बंद
>लवकर निवृत्ती घेण्याची योजना बंद
>सुरक्षेच्या बजेटमध्ये ३० कोटी युरोची कपात
>जहाज कंपन्यांवरील कर वाढवणे
>रेस्तराँ आणि केटरर्ससाठी २३ टक्के व्हॅट
>हॉटेल व्यवसायासाठी १३ टक्के व्हॅट
>युरोझोनकडे ५३५० कोटी युरोची मदतीची मागणी