आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादक यादीत देशाच्या क्रमवारीत सुधारणा, "युनिडो'चा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- भारत जगातील सर्वात मोठा सहावा उत्पादक देश बनला आहे. जगातील "टॉप-१०' उत्पादकांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत तीनने सुधारणा झाली असून भारत आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या आधी भारताचा नववा क्रमांक होता.

संयुक्त राष्ट्र आैद्योगिक विकास संघटना (युनिडो) च्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक लेखा पुस्तिका -२०१६ मध्ये देण्यात अालेल्या यादीनुसार पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर जपानचा क्रमांक लागतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर जर्मनी तर पाचव्या क्रमांकावर दक्षिण काेरिया आहे. इंडोनेशिया सर्वात नीचांकी पातळीवर आहे.
उत्पादनाच्या वाढीसह २०१५ मध्ये भारतातील उत्पादन मूल्यवर्धित (एमव्हीए) मध्ये २०१४ च्या तुलनेत ७.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादन तिमाही आकडेवारीनुसार २०१५ च्या शेवटच्या तिमाहीत (ऑक्टोंबर ते डिसेंबर) देशातील उत्पादनात २०१४ च्या समान तिमाहीच्या तुलनेत एक टक्का वाढ झाली आहे.

या अहवालानुसार २०१५ मध्ये जागतिक पातळीवरील उत्पादन दरात २.८ टक्क्यांची घट झाली आहे. अनेक मोठ्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनात घट झाली असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.