आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदी : औद्याेगिक क्षेत्रात दुसऱ्या महिन्यातही तेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय औद्योगिक क्षेत्रात सलग दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्येही सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. निक्केई मार्केट इंडियाचा “मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ म्हणजेच पीएमआयच्या महिन्याच्या सर्वेक्षणानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये मागणीत झालेल्या वाढीमुळे या क्षेत्रात थोडी सुधारणा नोंदवण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार उत्पादन पीएमआय फेब्रुवारी महिन्यात ५०.७ या पातळीवर पोहोचले आहे. त्या आधीच्या महिन्यात जानेवारीमध्ये हा आकडा ५०.४ वर होता.
 
भारतीय औद्योगिक उत्पादनाच्या मागणीत झालेल्या सुधारणेमुळे आणि उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्याचा फायदा मिळाला असल्याचे मत आयएचएस मार्केटचे अर्थतज्ज्ञ पालियाना डे लिमा यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त मागणीतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. किमतीचा विचार केल्यास फेब्रुवारी महिन्यात खरेदी आणि विक्री दोन्ही किमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. कमोडिटीच्या किमतीही वाढल्या आहेत.

महागाई दरात वाढ
फेब्रुवारी महिन्यात महागाई दरात तेजी नोंदवण्यात आली आहे. यामुळे कंपनी शुल्कात वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच महागाई दरात तेजी नोंदवण्यात आली असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
नोटाबंदीनंतरही वाढ
डिसेंबर २०१६ ला संपलेल्या नोटाबंदीनंतर फेब्रुवारीत सलग दुसऱ्या महिन्यात औद्याेगिक क्षेत्रात सुधारणा नोंदवण्यात आली आहे. ५० च्या वरती आकडा आल्यामुळे या क्षेत्रात वाढ होत असल्याचे संकेत मानले जातात. वास्तविक अनेक महिन्यांची सरासरी आकडेवारीची (५४.२) तुलना केल्यास औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी अजूनही मंदीत असल्याचे दिसते.
बातम्या आणखी आहेत...