आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Growth Rate Of Service Sector Increased This Year

सेवा क्षेत्रातील वाढ उच्चांकी पातळीवर, नव्या ऑर्डरमुळे सकारात्मक परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेवा क्षेत्रातील देशाचा विकासदर आठ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पाेहोचला आहे. निक्कीच्या मते, नव्या बिझनेस ऑर्डरमुळे या वाढीची नोंद झाली आहे, तर उत्पादनात मात्र मंदी दिसून आली आहे.

निक्की बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्समध्ये सेवा क्षेत्रातील वाढ सप्टेंबरमध्ये असलेल्या ५१.३ च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढून ५३.२ वर पोहोचली आहे. उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा िवकास दर चांगला असल्याचे मत अर्थतज्ज्ञ पोलियाना दे लिमा यांनी व्यक्त केले आहे. गेल्या महिन्यात सेवा क्षेत्राला अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या असल्यानेच हे संभव झाले असल्याचे मतही त्यांनी नोंदवले आहे.

दुसरीकडे, निक्की इंडियाचा सीझनली कंपोझिट पीएमआय इंडेक्सदेखील सप्टेंबरच्या ५१.५ ने वाढून ऑक्टोबरमध्ये ५२.६ झाला आहे. विशेष म्हणजे सीझनली कंपोझिट पीएमआय आऊटपूट इंडेक्समध्ये उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांचा समावेश करण्यात येतो.

अर्थव्यवस्थेला फायदा
सेवा क्षेत्रातील वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचे लिमा यांनी सांगितले. यामुळे ऑक्टोबरमध्ये विकासदरातदेखील वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील आऊटपूटमध्ये वाढ होत असल्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये जास्त मजबुती येत असल्याचे मतही लिमा यांनी व्यक्त केले.