आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी : मुंबईबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू सेवाकर विधेयक (जीएसटी) लागू झाल्यानंतर जकात कर बंद होणार असल्यामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक हाल हाेऊ देणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयोगी पक्ष शिवसेनेला दिली असली तरी हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची मदत घ्यावी लागणार असून उभय नेत्यांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ सूत्राने दिली.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची अलीकडेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेऊन मुंबईचा प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. देशभर जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर जकात कर रद्द हाेणार अाहे. याचा मुंबई महापालिकेला माेठा फटका बसणार असल्याने शिवसेना अस्वस्थ अाहे. मुंबई महापालिकेची अार्थिकबाजू खिळखिळी करणारे हे विधेयक असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली हाेती. महाराष्ट्र सरकारने हा कायदा मंजूर करण्याआधी शिवसेनेला विश्वासात घेतले. मात्र, शिवसेनेचा विश्वासघात हाेणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस यांना घ्यावी लागणार अाहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचा सल्ला दिला अाहे. पंतप्रधान अाणि मुख्यमंत्री यांची ही बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हाेण्याची शक्यता अाहे. या बैठकीला अरुण जेटली अाणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील.
जीएसटीमुळे मुंबईतील चार प्रमुख चेकपोस्ट बंद हाेतील. येथून हजाराे ट्रक जातात, चेकपोस्ट अाणि टाेलच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला ते साडेसात हजार काेटी रुपयांचा वर्षाकाठी महसूल मिळताे. त्यातून अाराेग्य, बेस्ट अादी सुविधा पुरविल्या जातात.
बातम्या आणखी आहेत...