आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे: GSTN पोर्टलवर 24 जुलैपासून अपलोड करता येईल इनव्हाइस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यापारी आणि ट्रेडर्स 24 जुलैपासून जीएसटीएनच्या पोर्टलवर आपल्या विक्री आणि खरेदीचे इनव्हॉइस अपलोड करू शकतील. पोर्टलवर 1 जुलैनंतर जनरेट झालेले इनव्हॉइस अपलोड करता येतील. जीएसटीच्या आयटी नेटवर्कचे काम पाहणाऱ्या जीएसटीएन नेटवर्कने रविवारी याची माहिती दिली.
 
रोज अपलोड करू शकता इनव्हॉइस
जीएसटी नेटवर्कचे चेअरमन नवीन कुमार म्हणाले, आम्ही 24 जुलैपासून या पोर्टलवर इनव्हाइस अपलोड करण्याची सुविधा सुरू करणार आहोत. यामुळे व्यापारी आपल्या पातळीवर दररोज किंवा आठवड्यातून केव्हाही इनव्हाइस अपलोड करू शकतील. यामुळे महिन्याच्या शेवटी इनव्हॉइस अपलोड करण्याच्या त्रासातून सुटका मिळेल.
बातम्या आणखी आहेत...