आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : अहो आश्चर्य! इथे रोबोट करतो गणपतीची आरती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. औरंगाबादमध्ये अगदी साध्या स्क्रूपासून ते ऑटोमेशन मशीनपर्यंत सर्वकाही तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या आपले उत्पादन जगभरातील ऑटो, अभियांत्रिकीस आणि संरक्षण क्षेत्रातील बड्या कंपन्यांसाठी तयार करून देतात. मग, हे तंत्रज्ञान केवळ व्यवसाय अथवा उद्योगासाठीच का वापरावे? हा विचार करून वाळूज औद्योगिक वसाहतीतील \'टूल टेक टूलिंग्स\' कंपनीच्या टीमने वेल्डिंगसाठी वापरला जाणारा रोबोटच्या हातानेच गणपती बाप्पाची आरती करण्याचा निर्णय घेतला. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या 15 दिवसांपूर्वी मनातील संकल्पना टीमने प्रत्यक्षात साकारली. 
 
\'दिव्य मराठी वेब टीम\' शी बोलतांना \'टूल टेक टूलिंग्स\'चे संचालक सुनिल किर्दक म्हणाले की, औरंगाबादमधील उद्योग संघटना सातत्याने नव्या संकल्पनेवर काम करतात. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या बळावर जगाच्या पाठीवर ऑटोमोबाईल हब म्हणून येथील उद्योजकांनी नावलौकीक मिळविला. याचा वापर सामाजिक कामासाठी करावा हे आमच्या कायम मनात असते. संधी मिळेल त्याप्रमाणे आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही ऑक्सिजन रिच एमआडीसी या संकल्पनेवर काम करतोय. या अंतर्गत येत्या वर्षभरात 50 हजार झाडे लावून ती जगविण्याचा आमचा निश्चय आहे.
 
अशी सुचली रोबोटच्या हाताने गणपती बाप्पाच्या आरतीची संकल्पना
 
यावर्षी गणेशोत्सवानिमीत्त गो ग्रीन ही संकल्पना राबविली. यासंदर्भात अधिक खोलात विचार केला असता, आपल्याच कंपनीतील रोबोटच्या हाताने गणपतीची आरती करू शकतो, हा विचार टीमच्या मनात आला. अगदी पंधरा दिवसांपूर्वी केवळ संकल्पनेत असलेला हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी टीमने 15 दिवस अथक परिश्रम केले. संगणकावर या रोबोटचा अचूक प्रोग्राम झाल्यानंतर टीमने अवघ्या एका रात्रीतून या रोबोटची जुळवणी केली. मायक्रॉनमध्ये कामाचा अनुभव असल्याने अगदी पंधरा दिवसांत हा रोबोट तयार करणे शक्य झाले. या रोबोटसाठी कंपनीतील प्रदीप पांडे, शुभम सौरभ, भरत पाटील, सुभाष मोरे, प्रदिप पांडे, मिलींद लोखंडे आणि वैभव देशमुख यांनी परिश्रम घेतले. 

पुढील वर्षी मिळेल सरप्राईज
 
आम्ही दरवर्षी गणेशोत्सवानिमीत्त नव्या संकल्पना घेऊन काम करतो. पुढील वर्षी आणखी वेगळेपण देण्याचा प्रयत्न आमच्या टीमचा राहिल. पुढील वर्षीचा टूल टेक टूलिंग्समधील गणपती बाप्पा नक्कीच सरप्राईज घेऊन येईल, असा विश्वास श्री. किर्दक यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...