आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीटी किमतीबाबत तेलंगणा राज्याच्या आदेशास उच्च न्यायालयाची स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेलंगणा राज्यशासनाने बीटी कापूस बियाण्यांची किंमत ठरवणारा शासन आदेश काढला होता. त्यानुसार बीजी-१ वाणांची प्रतिपाकीट किंमत ८३० रुपये आणि बीजी - २ वाणांची किंमत ९३० रुपये निश्चित करण्यात आली होती. त्याबरोबर दुष्काळामुळे गेल्या वर्षीच्या किमती कायम ठेवण्यात आल्या होत्या. याला कंपनीने तेलंगणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने शासनास ट्रेटची किंमत ठवण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिला आहे.

सदरील प्रकरणी कंपनीच्या वतीने अॅड थुम श्रीनिवासन आणि तर राज्य शासनाच्या बाजूने अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल यांनी बाजू मांडली. याच पद्धतीने आंध्र प्रदेश सरकारच्या आदेशालादेखील आव्हान देणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात संभ्रम
बीटी कापसाच्या बियाण्यांच्या किमती राज्यातदेखील शासनामार्फत निश्चित करण्यात येतात. यात बीजी-१ वाण ८३० रुपयांना तर बीजी-२ वाण ९३० रुपयांना गेल्या विक्री होत आहे. यात किमतीत गेल्या पाच वर्षांत वाढ झालेली नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासन किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात चांगल्या वाणांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...