आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुस्तान झिंक करणार पाच वर्षांत ८ हजार कोटींची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - जस्त, शिसे आणि चांदी उत्पादनात जगातील अग्रणी हिंदुस्तान झिंकने गेल्या रविवारीच ५० वर्षे पूर्ण केली आहेत. यासोबतच कंपनीने हे वर्ष सुवर्णजयंती वर्षाच्या स्वरूपात साजरे करण्याची घोषणा केली. ही कंपनी पाच वर्षांत खदान, स्मेल्टरचा विस्तार, विकास आणि नवीन तंत्रज्ञानाच्या स्थापनेवर ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा हवाला देत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

ग्लोबल बिझनेस झिंकचे अध्यक्ष अखिलेश जोशी यांनी सांगितले की, येणाऱ्या पाच वर्षांत कंपनी लोह खनिज उत्पादनात वाढ करून ९.३९ लाख टनांवरून १४ लाख टन करणार अाहे. तर धातू उत्पादनात वाढ करून ८५ हजार टनांवरून १.१० लाख टन करेल. गेल्या वर्षी १२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकने असलेल्या मालमत्तेच्या विकासाबरोबरच शेअरधारकांनाही फायदा मिळवून दिला आहे. कार्यकारी अधिकारी सुनील दुग्गल यांनी सांगितले की, आम्ही गॅल्व्हेनायझिंगच्या इतर शक्यतांचा तपास करत आहोत.

गुंतवणुकीमुळे मिळालेल्या यशाबाबत सांगताना जोशी यांनी सांगितले की, गुंतवणूकीमुळे आता ४७४ मेगावॅट पवनऊर्जेची निर्मिती होत आहे. देशातील सर्वात स्वस्त आणि आत्मनिर्भर कंपनी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कंपनी पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञान, विस्तार, संशोधन, मोठ्या गुंतवणुकीतून पाचपट उत्पादन वाढ मिळवण्यात यशस्वी झाली असल्याचे जोशी यांनी सांगितले.

संचालक (उत्पादने) नवीन सिंघल यांनी सांगितले की, स्टरलाइटचे अधिग्रहण करताना धातू उत्पादनाची क्षमता २ लाख टन होती. आता ही १० लाख टनांपेक्षा जास्त झाली आहे. वार्षिक उत्पादन क्षमता ३४.५ लाख टनांवरून १०२.५ लाख टन झाली आहे. कंपनीकडे मालमत्ता अधिभांडार १,४३७ लाख टन होते, जे सलग वापर करूनही ३,७५१ लाख टनांवर कायम आहे. हिंदुस्तान झिंकचे मुख्य वित्तीय अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, सरकारी खजिन्यात कंपनीचे योगदान ३६४ कोटी रुपयांनी वाढून २०१४-१५ मध्ये ५,००० कोटी रुपये झाले आहे. हिंदुस्तान झिंक ही अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वात लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या वेदांता रिसोर्सेस पीएससीची सहयोगी कंपनी अाहे.

देबारीमध्ये नवा खत प्रकल्प : कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख पवन कौशिक यांनी सांगितले की, हिंदुस्तान झिंक देबारीमधील फर्टिलायझर प्रकल्पात ५०,००० टन वार्षिक क्षमता असलेला डायअमोनियम खत प्रकल्प बनवणार आहे. येथ् १,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक लागणार आहे.